ठाणे - म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि अभिविपच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने ( ABVP Agitation in thane ) करत आंदोलन केले आहे. सरकारचा आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभाविप कार्यकर्त्यांनी धिक्कार आंदोलन सुरू केले आहे. त्यावेळी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपापसात आमनेसामने आले होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा जमवला आहे.
आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात -
म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि अभिविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी, राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपसात भिडल्याचे दिसून आले. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादी आणि अभाविपचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना उचलून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ पाहत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंदोबस्ताला -
या आंदोलनानंतर ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहेत. पोलिसांनी आंदोलन करते भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असले तरी आंदोलन पुन्हा एकदा होऊ शकते या भीतीमुळे पोलिसांनी देखील बंदोबस्त तैनात आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस जिलाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.
हेही वाचा - Anil Deshmukh At Chandiwal Commission : अनिल देशमुख, सचिन वाझे चांदीवाल आयोगा समोर हजर