ETV Bharat / city

Abdul Shekhani Grants Bail - 'छेडेंगे तो छोडेंगे नही' इशारा देणाऱ्या अब्दुल शेखानीला जामीन मंजूर - अब्दुल शेखानी जामीन मंजूर

राज ठाकरेंनी मशिदीवर भोंगे काढण्याबाबत वक्तव्य केले ( Raj Thackeray Loudspeaker Issue ) होते. त्यावर अब्दुल शेखानीने 'छेडेंगे तो छोडेंगे नही', असा इशारा दिला होता. त्याप्रकरणी आता शेखानीला जामीन मिळाला ( Abdul Shekhani Grants Bail Thane Court ) आहे.

abdul shekhani
abdul shekhani
author img

By

Published : Apr 18, 2022, 10:45 PM IST

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत वक्तव्य केले ( Raj Thackeray Loudspeaker Issue ) होते. त्यानंतर मुंब्रा परिसरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानीने ( Abdul Shekhani Warning Raj Thackeray ) निदर्शने करीत 'छेडेंगे तो छोडेंगे नही', असा इशारा दिला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात शेखानी आणि अन्य 25 जणांविरोधात भादंवि १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ठाणे न्यायालयाने शेखानीला 15 हजारांच्या जातमुचलावर जामीन मंजूर केला ( Abdul Shekhani Grants Bail Thane Court ) आहे.

राज ठाकरेंच्या विधानाला प्रतिउत्तर देताना शुक्रवारी अब्दुल मतीन शेखानीने कोणतीही परवानगी न घेता जनसभा घेतली. तसेच, 'छेडेंगे तो छोडेगे नही', असा इशारा देत मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक काडलक यांना निवेदन दिले. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी शेखानी याला १८८ नुसार नोटीस बजावून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

परवानगी न घेता जनसभा घेणे, वादग्रस्त विधान करणे, समुदायाच्या भावना भडकविणे सारख्या कलमांतर्गत गुन्ह्यात अटक होण्याच्या शक्यतेने शेखानी भूमिगत झाला. मुंब्रा पोलीस त्याला अटक करु शकले नाही. अखेर आज ( 18 एप्रिल ) शेखानीने न्यायालय गाठत दाखल गुन्ह्यात 15 हजारांच्या जातमुचलावर जामीन मिळवला आहे.

हेही वाचा - Narayan Rane Adhish Bunglow : नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर कधीही पडू शकतो हातोडा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.