ETV Bharat / city

मुलाच्या वाढदिवसावरून वाद; पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार - A spouse quarrels over celebrating a child's birthday

बदलापूर येथे मुलाच्या वाढदिवसावरून पती पत्नीत वाद झाला. या वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारला, यानंतर त्याच्यावर सुरीने वार केल्याची घटना घडली आहे.

A spouse quarrels over celebrating a child's birthday
मुलाच्या वाढदिवसावरून वाद
author img

By

Published : Dec 13, 2019, 6:57 PM IST

ठाणे - मुलाचा वाढदिवस साजरा करण्यावरून उद्भवलेल्या भांडणात संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारला. यानंतर भाजी कापण्याच्या सुरीने हनुवटीवर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मुथू थोडामन (वय ३७) असे जखमी पतीचे नाव आहे, तर लक्ष्मी असे हल्लेखोर पत्नीचे नाव आहे.

मुलाचा वाढदिवस साजरा करण्यावरून पती पत्नीत भांडण, पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार

हेही वाचा... भोपाळ : सुधारगृहातून तब्बल ८ बालगुन्हेगार फरार, प्रशासनाची बेपर्वाई चव्हाट्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी परिसरात मुथू थोडामन हा पत्नी व मुलासह राहतो. त्याचा मुलगा शक्ती याचा वाढदिवस असल्याने मुथू याने मुलाचा वाढदिवस त्याच्या आजीच्या घरी साजरा करण्यासाठी केक आणला होता. त्यांनतर वाढदिवसाचा केक घेऊन रात्री साडे ११ च्या सुमारास मुथू हा त्याच्या आईच्या घरी जाण्यास निघाला. त्यावेळी पत्नीने आपल्या घरातच वाढदिवस साजरा करण्यास पतीला सांगितले. मात्र, पतीने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन संतापलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ करीत घरातील किचनमधील लोखंडी फ्राय पॅन डोक्यात मारला. तसेच भाजी कापण्याच्या सुरीने पतीच्या हनुवटीवर व उजव्या हाताच्या बोटावर वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी लक्ष्मी हिच्याविरूध्द बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. अधिक तपास महिला पोलीस नाईक खेडउकर करीत आहेत.

हेही वाचा... राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

Intro:kit 319Body:मुलाच्या वाढदिवसा वरून वाद ; पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने वार : पत्नी अटकेत

ठाणे : मुलाचा वाढदिवस साजरा करण्यावरून उद्भवलेल्या भांडणात संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून भाजी कापण्याच्या सुरीने हनुवटीर वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मुथू थोडामन (३७) असे जखमी पतीचे नाव आहे. तर लक्ष्मी असे हल्लेखोर पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बदलापुर पयिचम येथील रमेशवाडी परिसरात मुथू थोडामन हा पत्नी व मुलासह राहतो. त्याचा मुलगा कु .शक्ती याचा वाढदिवस असल्याने मुथू याने मुलाचा वाढदिवस त्याच्या आजीच्या घरी साजरा करण्यासाठी केक आणला होता. त्यांनतर वाढदिवसाचा केक घेऊन रात्री साडे ११ च्या सुमारास मुथू हा त्याच्या आईच्या घरी जाण्यास निघाला. त्यावेळी पत्नीने आपल्या घरातच वाढदिवस साजरा करण्यास पतीला सांगितले. मात्र पतीने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन संतापलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ करीत घरातील किचनमधील लोखंडी फ्राय पॅन डोक्यात मारला. तसेच भाजी कापण्याच्या सुरीने पतीच्या हनुवटीवर व उजव्या हाताच्या बोटावर वार करून त्याला जखमी केले.

या प्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी लक्ष्मी हिच्याविरूध्द बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. अधिक तपास महिला पोलीस नाईक .खेडउकर करीत आहेत.

Conclusion:bdlapur

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.