ETV Bharat / city

Online Payment Fraud : एक-एक रुपये पाठवून 30 लाखांचा गंडा घालणारा 'हायटेक नटवरलाल' अटकेत

सध्याचे युग हे आधुनिक युग आहे. या युगात चोरही हायटेक झाले असून चोरी व फसणूक करण्याची पद्धतीही बदलल्या आहेत. एका उच्चशिक्षित तरुणाने 'फोन पे'चे स्क्रीनशॉट्समध्ये फेरफारकडून फोन पेच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे भासवत 14 ज्वेलर्स व 32 हॉटेल चाकांना 30 लाखांचा गंडा ( Online Payment Fraud ) घातला आहे. सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर ( वय 33 वर्षे, मुळ रा. नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगड, सध्या रा. अंधेरी), असे त्या हायटेक नटवरलालचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 3, 2022, 11:00 PM IST

ठाणे - सध्याचे युग हे आधुनिक युग आहे. या युगात चोरही हायटेक झाले असून चोरी व फसणूक करण्याची पद्धतीही बदलल्या आहेत. एका उच्चशिक्षित तरुणाने फोन पेचे स्क्रीनशॉट्समध्ये फेरफारकडून फोन पेच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे भासवत 14 ज्वेलर्स व 32 हॉटेल चाकांना 30 लाखांचा गंडा ( Online Payment Fraud ) घातला आहे. सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर ( वय 33 वर्षे, मुळ रा. नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगड, सध्या रा. अंधेरी), असे त्या हायटेक नटवरलालचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

सुब्रम्हण्यम अय्यर हा बेरोजगार त्याचे घर आईच्या पेन्शनवर चालत होते. मात्र, आईचे निधन झाल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी सुब्रम्हण्यम हा कुठलेही काम करत नसल्याने त्याला घराबाहेर काढले होते. उदरनिर्वाह कसा करायचा आणि मौजमज्जा करण्यासाठी त्याने मोबाईल अॅपचा वापर करून ऑनलाइन पेमेंटद्वारे ( Online Payment Fraud ) हॉटेल आणि ज्वेलर्स व्यवसायिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या अॅपचे वापर करून क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचा पहिले निश्चित रक्कमेचा ट्रांजेक्शन करायचा ते ट्रांजेक्शन फेल झाल्यानंतर पुन्हा 1 रुपयाचे पाठवत होता. त्यानंतर 1 रुपये पाठवलेला मेसेज आणि फेल झालेल्या ट्रांजेक्शनचे स्क्रीन शॉर्ट एका अॅपच्या मदतीने एडीट (मर्ज) करून व्यवसायिकाला दाखवून तेथून पोबारा करत होता. मात्र, हजारो रुपयांच्या बदल्यातकेवळ एक रुपये पाठवून तो व्यवसायिकाची फसवणूक करत होता.

शंका आल्याने मिळाला आरोपी - ठाण्यातील ज्युपिटर येथील ब्लू स्टोन ज्वेलरीच्या दुकानात 28 जानेवारीला एका तरुणाने 97 हजार 330 रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. हे दागिने खरेदी केल्यानंतर आरोपीने ऑनलाइन पेमेंट केले. पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट त्याने दागिके दुकानदाराला दाखवले. मात्र, दुकानदाराला शंका आल्याने दुकानदाराने दरवाजे बंद करून पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पूर्ण भारतात 14 ज्वेलर्स आणि 32 हॉटेल्समध्ये अशा प्रकारे फसवणूक करून 30 लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर हा उच्चशिक्षित असून त्याने एमबीए आयटीचे शिक्षण घेतलेले आहे.

अनेक गुन्हे दाखल - त्याने आतापर्यंत अहमदाबाद, बडोदा, बिलासपूर, पणजी, पुणे, मुंबई, सुरत, भोपाल, इंदूर, हैदराबाद अशा अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये अशी फसवणूक केली आहे. केवळ 1 रुपयांचे ट्रांजेक्शन करून तब्बल 25 ते 30 लाखांचा व्यवसायिकांना गंडा घातला आहे. या आरोपी सुब्रम्हण्यम याच्या विरोधात यापूर्वी मुंबई आणि हैदराबाद येथे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांनी राहावे सतर्क - मोठी ज्वेलर्सची दुकाने आणि मोठ्या हॉटेल्समध्ये ऑनलाइन पेमेंटचे ट्रांजेक्शन झालेले मेसेज हे उशिरा येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या वाढ होत चालली आहे. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी व्यावसायिकांनी झेलेल्या ट्रांजेक्शनची हिस्टरी पाहून शहानिशा करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी केल आहे.

हेही वाचा - Thane Collector Action : समीर वानखेंडेना मोठा झटका, हॉटेल आणि बारचा परवाना रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.