ठाणे - ठाण्यातील खोपट येथील एका दुचाकी स्पेअर पार्टच्या दुकानाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले.
खोपट परिसरात अभिषेक हॉटेलच्या मागच्या बाजूला दुचाकीचे सुट्टे पार्ट विकणारे दुकान आहे. या दुकानाला बुधवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं आपत्ती व्यवस्थापन यांनी सांगितले दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अश्विनी टीव्हीएस या नावाचे रमेश पवार यांचे हे दुकान असून अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस ठाणे अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने मदतकार्य करीत करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाने अग्निशमन दलाने तीन वॉटर टँकर, एक जम्बो फायर इंजिनच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सुदैवाने अपघात टळला.