ETV Bharat / city

Girl died in truck accident : झोपडीवर उलटला ट्रक, टेडी बियर विकणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

झोपडीवर ट्रक उलटल्याने एका लहान मुलीचा मृत्यू ( Girl sell teddy bear died in thane ) झाल्याची घटना घडली आहे. काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मधू भाटी ( Madhu Bhati death in truck accident thane ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

girl died in truck accident in thane
ट्रक अपघात ठाणे मुलीचा मृत्यू
author img

By

Published : Jul 23, 2022, 6:53 AM IST

ठाणे - झोपडीवर ट्रक उलटल्याने एका लहान मुलीचा मृत्यू ( Girl sell teddy bear died in thane ) झाल्याची घटना घडली आहे. काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मधू भाटी ( Madhu Bhati death in truck accident thane ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या 14 वर्षीय मुलीला अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. मधूचे कुटुंब हे टेडी बिअरचा व्यवसाय करतात. खेळणी विकून मुलांना आनंद देणाऱ्या मधूच्या मृत्यूने परिसरात दुखाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत कोणतेही धोरण राबवलं नाही; नरेश मस्केंचे उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

ठाणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या कडेला टेडी बिअर, खेळणी विकणारे, तसेच अन्य विक्रते व्यवसाय करून तिथेच आडोशाला झोपडी बांधून उदरनिर्वाह करत असतात. माजिवडा पुलानजिक रुस्तमजी समोरील लोढा येथे गुजरातवरून आलेले भाटी कुटुंब टेडी बिअरचा व्यवसाय करतात. काल सकाळी अचानक मुंबई - नाशिक मार्गिकेवर विटा वाहून नेणारा रिकामा डम्पर चालकाचा ताबा सुटून भाटी यांच्या झोपडीवर उलटला. यामध्ये झोपडीत गाढ झोपेत असलेली १४ वर्षांची मधू ट्रकच्या खाली अडकली गेली. त्वरीत कापूरबावडी वाहतूक पोलीस विभागाचे मनोज यांनी आपत्ती नियंत्रण विभागाशी संपर्क साधून मधूला बाहेर काढले. तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.

परिसरातील नागरिकांना रडू कोसळले - हा अपघात घडला तेव्हा त्या परिसरातील अनेक नागरिक लगेचच जमा झाले. लहान मुलांना आनंद देणाऱ्या खेळण्यांच्या विक्रेत्याचा अपघात पाहून ते गहिवरले. मधूचा अंत पाहून परिसरातल्या महिलांनी हंबरडा फोडला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी हायवेवर जगणारे हे कुटुंब हतबल झाले होते. या कुटुंबासाठी परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती मदत करण्याचे जाहीर केले.

हेही वाचा - Thane Forest Officer Death : वनकर्मचाऱ्याचा धबधब्यात संशयास्पद मृतदेह; पतीच्या मृत्यू प्रकरणी पत्नीची पोलिसांकडे धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.