ठाणे : एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने ( Suicide of a Minor Student ) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या ( Suicide By Jumping From The Third Floor ) केल्याची घटना ७ दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे मृतक तरुणीवर लैंगिक अत्याचार करतानाचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ( Threatening to Make Pornographic Videos Viral ) असल्याने तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
आत्महत्येला वेगळे वळण : या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सात महाविद्यालयीन तरुण, एक तरुणी अशा आठ जणांविरोधात पाच दिवसांपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आठही जणांना अटक केली होती. आता मात्र या घटनेला वेगळं वळण लागल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने त्या आठही आरोपी विरोधात सामूहिक बलात्कारासह पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षापासून मृतक विद्यार्थिनीवर अत्याचार : मृतक अल्पवयीन विद्यार्थिनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इमारतीत कुटुंबासह राहत होती. ती कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्या सोबतच तिची मैत्रिणी आणि सात मित्र असा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होता. दीड वर्षांपासून हे आरोपी सात तरुण आणि एक तरुणी मिळून मृतक विद्यार्थिनीला विविध कारणाने त्रास देत होते. शिवाय तिच्या साधेपणाचा गैरफायदा घेत आरोपी तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच अत्याचार करतानाचे अश्लील व्हिडीओ क्लिप आरोपी तरुणांनी तयार केल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून हेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आठही आरोपी तिला वारंवार त्रास देत होते.
कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने आत्महत्या : अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर आपली, कुटुंबाची बदनामी होईल. घरात हा प्रकार समजला तर आपणास कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती या मृत विद्यार्थिनीला होती. त्यामुळे नैराश्य आलेल्या तिने काटेमानिवली येथील राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजलावरून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांनी केली आरोपीला अटक : सोसायटीच्या आवारात मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी बाहेर आले. त्यावेळी त्यांना तरुणीने आत्महत्या केल्याचे समजले. या प्रकरणात कुटुंबीयांच्या माहितीवरून पोलिसांनी सात तरुण, एका तरुणीविरुद्ध मानसिक त्रास देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे कायद्याखाली आरोपी विद्यार्थ्यांवर पाच दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली होती.
आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ : आज दुपारच्या सुमारास आठही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ दिवस पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे कल्याण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हेही वाचा : Kalyan Crime News : दीड वर्ष 7 जणांकडून लैगिंक अत्याचार; तरुणीची इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या