ठाणे - ठाण्यातील येऊरमधील पाटोणपाडा येथे असणाऱ्या नील तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर अजून एक जण बेपत्ता असल्याची घटना समोर अली आहे. बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी करत आहेत.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास सहा मित्र जेऊर येथील पाटोनापाडा येथे असणाऱ्या निल तलावात पोहण्यासाठी गेले होते. यानंतर सकाळी साडे आठच्या सुमारास प्रसाद पावसकर मुलाच्या डोक्याला पाण्यातील दगड लागल्याने चक्कर आली व तो पाण्यात पडला. मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढले परंतु पुन्हा चक्कर आल्याने तो पुन्हा पाण्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच अग्निशमन केंद्राचे कर्मचारी आणि ठाणे वर्तकनगर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, एक बेपत्ता
ठाण्यातील येऊरमधील पाटोणपाडा येथे असणाऱ्या नील तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर अजून एक जण बेपत्ता असल्याची घटना समोर अली आहे.