ETV Bharat / city

Live In Relationship: खळबळजनक, 8 महिन्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 9 महिलांची हत्या - 9 women in live in relationship killed

Live In Relationship: गेल्या काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशिप Live In Relationship राहणाऱ्या जोडप्याची संख्या वाढत असतानाच त्या दोघांमधील लहान- सान गोष्टीवरून वाद होत. हे वाद विकोपाला जाऊन ठाणे शहर आयुक्तालयातील Thane City Commissionerate विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या ८ महिन्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ९ महिलांच्या हत्या झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे ८ महिन्यात ५५ हत्येचे गुन्हे शहरी भागातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ५१ गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Live In Relationship
Live In Relationship
author img

By

Published : Oct 6, 2022, 8:13 PM IST

ठाणे गेल्या काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशिप Live In Relationship राहणाऱ्या जोडप्याची संख्या वाढत असतानाच त्या दोघांमधील लहान- सान गोष्टीवरून वाद होत. हे वाद विकोपाला जाऊन ठाणे शहर आयुक्तालयातील Thane City Commissionerate विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या ८ महिन्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ९ महिलांच्या हत्या झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे ८ महिन्यात ५५ हत्येचे गुन्हे शहरी भागातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ५१ गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी उलगडा केलेल्या ५१ पैकी ९ गुन्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिप मधला वाद विकोपाला गेल्याने साथीदारानेच महिला साथीदारास संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या काही जोडप्यांचा विकोपाला जाणारा वाद महिलांच्या जीवावर उठत असल्याचे दिसून येत आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या २४ वर्षीय तरुणीची तिच्याच साथीदाराने गळा दाबून हत्या केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपीने रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह गुपचूप कर्नाटक राज्यातील विजापूरला नेण्याचा प्रयत्न होता. मात्र, भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत अटक करून रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. तर भिवंडी तालुक्यातही अश्या एका लिव्ह इन रिलेशनशिमध्ये राहणाऱ्या दोघांमध्ये वाद होऊन आरोपीने महिलेची हत्या करून बिहारला पळून गेला होता. याही गुन्ह्यातील पोलिसांनी एका आरोपीला १५ दिवसापूर्वीच बिहारमधून अटक केली आहे.

आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यलयाअंतर्गत असलेल्या शहरी भागात ३५ पोलीस ठाणे आहेत. याच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोंद असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या 8 महिन्याच्या कालावधीत एकूण ५५ हत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी ५१ गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हत्येसारखे गंभीर गुन्ह्यांबरोबरच हत्येचा प्रयत्न, जबर मारहाण, फसवणूक आदी देखील प्रकार लिव्ह इनच्या प्रकारातून समोर येत आहेत. अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी अनेक जोडप्यांमध्ये नसते.

अनेकवेळा लिव्ह इन रिलेशनशिप फक्त एक आकर्षण अनेकदा आपल्या पार्टनरच्या काही सवयी एकमेकांना आवडत नाहीत आणि छोट्यामोठ्या गोष्टीतून वाद होतात. काहीवेळा हे वाद इतके विकोपाला जातात की त्यातून गंभीर गुन्हे देखील घडतात, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले. अनेकवेळा लिव्ह इन रिलेशनशिप फक्त एक आकर्षण ठरते. रिलेशनमध्ये असल्यावर नवलाईचे 9 दिवस संपले की, एकमेकांचा खरा स्वभाव कळू लागतो. अशावेळी नात्याच्या बंधनातून बाहेर पडण्याची धडपड जोडपे करतात. आणि जोडीदारापासून पिच्छा सोडवण्यासाठी देखील हत्येसारखे गंभीर गुन्हे घडतात, असे गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिकार्याने सांगितले.

विवाह बंधनात अडकण्याऐवजी केवळ लिव्ह इनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर आधार दिला गेला असला तरी, या नात्याचा उपयोग अनेकवेळा चुकीच्या कामासाठी केला जातो. एका महिला समाजसेविकेच्या म्हणण्यानुसार एकूण ७५ टक्के लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्यात शारीरिक संबंध व फसवणूक हाच मुख्य उद्देश असतो. साहजिकच असे नाते पुढे वादाला कारण ठरते. त्यातून अनेक गंभीर गुन्हे देखील घडतात. अनामिक नात्याच्या या प्रवाहात फक्त महिलाच नव्हे, तर अनेकवेळा पुरुष देखील या आभासी नात्याच्या जाळ्यात अडकून गंडवले जातात. हल्लीच्या काळात विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून हा बाजार जोर पकडत असल्याचे दिसून येत आहे. काही विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांनी लिव्ह इन रिलेशनशीपसाठी नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विवाह बंधनात अडकण्याऐवजी केवळ लिव्ह इनमध्ये राहण्याकडे हल्लीच्या काळात जास्त पसंती दिली जात आहे.

कायदेशीर तत्वात नमूद सुप्रीम कोर्टाने २०१३ साली लिव्ह इन रिलेशनशिप बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानुसार अधिक काळापासून चालत आलेले नाते असे असले पाहिजे की ते टिकून राहतील आणि हे न्यायालय ठरवेल. जर दोघेही पार्टनर दीर्घकाळापासून त्यांचे आर्थिक आणि इतर प्रकारचे व्यवहार आपापसात वाटून घेत असतील. तर या नात्याला लिव्ह इन म्हटले जाईल, असे कायदेशीररित्या जाहीर करण्यात आले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना दोघांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे नमूद करण्यात आले आहे. रिलेशनशिपमध्ये असताना मुलाचा जन्म झाला, तर ते नाते लिव्ह इन मानले जाईल. शारीरिक संबंध आणि मुल होणे हे दोघांच्याही इच्छेवर अवलंबून राहील, असे देखील कायदेशीर तत्वात नमूद आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले केवळ शारीरिक संबंधासाठी एखाद्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर पुरुष त्या महिलेला सोडू शकत नाही. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, मालमत्तेचा अधिकार, ब्रेकअप झाल्यास पोटगी, मुलाला वारसा ? या महिलांच्या अधिकारांचा त्यात समावेश आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे. दोन प्रौढ व्यक्ती लग्न न करताही स्वतच्या इच्छेने कौटुंबिक वैवाहिक जीवन जगू शकतात. विधिमंडळ लिव्ह इन रिलेशनशिपलाही वैध मानते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.