ETV Bharat / city

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण; लवकरच मिळणार नागरिकांना दिलासा

पुणे - मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा बोगदा हे प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली - काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा. असे निर्देश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी विभागाला दिले.

author img

By

Published : Nov 20, 2020, 7:53 AM IST

खासदार डॉ श्रीकांत शिंदे
खासदार डॉ श्रीकांत शिंदे

ठाणे - ऐरोली - काटई नाका उन्नत मार्ग फेज 1 चा आणि टनेल टप्पा फेज 1 च्या कामाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. काल (गुरवार) दुपारी 2 च्या सुमारास एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी कामाची पाहणी केली. यातील टप्पा क्रमांक 1 ( फेज 1 ) चे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच टनेल टप्पा क्रमांक 1 चे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे

प्रवास अधिक वेगवान होणार
ऐरोली ते मुंब्रा (वाय जंक्शन) या टप्प्यातील 6 मार्गिकांचे काम आणि टनेलचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाहून यावेळी खासदार डॉ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. ऐरोली ते मुंब्रा (वाय जंक्शन) आणि मुंब्रा (वाय जंक्शन) ते कटाई पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होईल. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

डॉ शिंदे यांच्याकडून कामाचा वेळोवेळी स्वतः पाठपुरावा
शीळफाट्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खासदार डॉ शिंदे या कामाचा वेळोवेळी स्वतः पाठपुरावा करत आहेत. या प्रकल्पात पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यापेक्षा जास्त लांबीचा बोगदा आहे. हेच प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचेही डॉ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

बाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल
टप्पा क्रमांक 2 (फेज 2) च्या कामासाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असून त्यास मान्यता मिळाल्यानंतर सर्व आवश्यक परवानग्या घेऊ. त्यानंतर जमीन संपादनाची प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. यात होणाऱ्या बाधितांचे पुनर्वसन देखील ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने एम.एम.आर.डी. मार्फत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात खासदार डॉ शिंदे यांनी उन्नत मार्ग 1 ( फेज 1 ) - टनेल टप्पा 1 ( टनेल फेज 1 ) या दोन कामांची पाहणी केली. तसेच नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली - काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित एम.एम.आर.डी.ए. च्या अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकल्पाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे-

ऐरोली काटाई नाका रस्ता प्रकल्प हा ऐरोली पुलापासून सुरू होऊन ठाणे - बेलापूर रस्ता , ठाणे - बेलापूर रेल्वे , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 , दिवा - पनवेल रेल्वे, इ. ओलांडून कल्याण - शीळ रस्त्यावरील कटाई नाका पर्यंत असून त्यांची एकूण लांबी 12.3 किमी आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध विभागाच्या जसे वन विभाग, पर्यावरण विभाग, च्या आवश्यक परवानग्या व भूसंपादन या बाबींचा विचार करता प्रकल्पाची व्याप्ती निश्चित करून तीन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार भाग 1 - ठाणे - बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 भाग 2 - ऐरोली पूल ते ठाणे - बेलापूर रस्ता व भाग 3 - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते कटाई नाका असे आहेत.

प्रकल्पाचा भाग - 1 हा ठाणे - बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 यांचे दरम्यान असून यात अंशतः उन्नत व पारसिक डोंगरातून जाणाऱ्या डोंगराचा अंतर्भाव आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून उन्नत मार्गाच्या कामासाठी माहे नोव्हेंबर 2017, व बोगद्याच्या कामासाठी माहे मे 2018 मध्ये कार्यरंभ आदेश देण्यात आलेले असून या प्रकल्पाची अंदाजित किमंत रु.382 कोटी रुपये इतकी आहे.

तसेच रस्त्याची लांबी 3.50 कि.मी. असून यात अंतर्भूत असलेल्या बोगद्याची लांबी ( Twin Tunnel ) 1.69 की.मी. असून हा रस्ता 6 पदरी ( 3 + 3 मार्गिका ) सिमेंट काँक्रीट रस्त्याचा आहे. हा रस्ता संपूर्णत नवीन ( Missing Link ) आहे.

पुणे - मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यापेक्षा जास्त लांबीचा बोगदा हे प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बोगद्याची 1.69 कि.मी. असून बोगद्याची रुंदी 3+1 मार्गिका ( Refuse Lane ) आहे. या बोगद्याचे बांधकाम हे NATM या पद्धतीने ( Control Blasting ) या पद्धतीने करण्यात येणार आहे.

या बोगद्याच्या बांधकामादरम्यान 30 RMR प्रतीच्या दगडापेक्षा कमी दगड आढळल्यास कायमस्वरूपी लायनिंगचा वापर करण्यात येणार आहे. बोगद्याच्या बांधकामा दरम्यान प्रथमतः 7 मीटर रुंद पायलट खोदकाम करण्यात येणार आहे. तसेच बोगद्यासाठी पंखे लावून व्हेंटिलेटशन साठी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच विद्युतीकरण देखील करण्यात येणार आहे.

हेही वाचा- देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हेही वाचा- पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.