ETV Bharat / city

धक्कादायक! सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून; संशयित ताब्यात - child rape in thane

सहा वर्षांच्या मुलीवर अज्ञात नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरालगतच्या कोनगाव परिसरात उघडकीस आला आहे. यानंतर आरोपीने संबंधित पीडित मुलीचा गळा आवळून खून केला असून, सरवली पाड्याजवळील पाईपलाईन येथील निर्जस्थळी ही घटना घडली आहे.

सहा वर्षांच्या मुलीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरालगतच्या कोनगांव परिसरात उघडकीस आला आहे.
author img

By

Published : Oct 29, 2019, 7:13 PM IST

ठाणे - अज्ञात नराधमाने सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरालगतच्या कोनगाव परिसरात उघडकीस आला आहे. यानंतर आरोपीने संबंधित पीडित मुलीचा गळा आवळून खून केला असून, सरवली पाड्याजवळील पाईपलाईन येथील निर्जस्थळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पीडितेचे आई-वडील हे मुळचे बिहार(नालंदा) येथील रहिवासी असून ते मोलमजुरीच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून सरवली येथील एमआयडीसीमध्ये स्थायिक झाले आहेत.

दिवाळीची सुट्टी असल्याने ती कुटुंबीयांसोबत घरात होती. मात्र, सायंकाळी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू झाला. शोध सुरू असतानाच सकाळी तिचा मृतदेह पाईपलाईन लगतच्या एका झुडपात आढळून आला.

या घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार संबंधित मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

यानंतर कोनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता 363, 302, 201, 364, 366(अ), 376 यांसह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4, 8, 9(एच) 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सध्या एका संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

Intro:kit 319Body:धक्कादायक ! सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून ; संशयीत नराधम पोलिसांच्या ताब्यात

ठाणे :- सहा वर्षीय मुलीवर अज्ञात नराधमाने अमानूष बलात्कार करून तिचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना भिवंडी शहरालगतच्या कोनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली पाडा ,पाईपलाईन येथील निर्जस्थळी घडली आहे. याप्रकरणी एका संशयीत नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माहीकुमारी (६) असे अमानूष बलात्कार करून खून केलेल्या चिमुरडीचे नांव आहे. मृतक चिमुरडी आईवडील हे मुळचे बिहार (नालंदा) येथील रहिवासी असून ते मोलमजुरीच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून सरवली येथील एमआयडीसीमध्ये आले आहेत. दिवाळी सणाची सुट्टी असल्याने माहीकुमारी हि कुटूंबीयांसोबत घरातच होती. मात्र सायंकाळी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा सर्वत्र शोध घेत असतानाच सकाळी तिचा मृतदेह पाईपलाइनलगतच्या एका झुडूपात आढळून आला.

या घटनेची माहिती कोनगांव पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,वपोनि. रमेश काटकर आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानूसार मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोनगांव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि.३६३ ,३०२ ,२०१ , ३६४ ,३६६ (अ ) ,३७६ सह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,९ (ह ) १० प्रमाणे गुन्हा दाखल करून एका संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

Conclusion:rep / mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.