ETV Bharat / city

ऑर्केस्ट्रा बारमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक, पोलीस कर्मचाऱ्यासह 6 अटकेत

बार मॅनेजरने आरोपीकडे दारूच्या बिलाचे १६ हजार ३२० रुपये मागितल्याने आरोपी वाद घातला बारमधून बाहेर पडले. मात्र मॅनेजर बिलाची मागणी करीत असल्याचे पाहून आरोपी मंगलसिंग याने चल माझ्या कारजवळ तुला बिल देतो, असे म्हणून जवळच असलेल्या रिव्हॉल्व्हरचा मॅनेजरला धाक दाखवून शिवीगाळ करीत राडा घातला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

ऑर्केस्ट्रा बार गोंधळ
ऑर्केस्ट्रा बार गोंधळ
author img

By

Published : Oct 19, 2021, 3:06 PM IST

Updated : Oct 19, 2021, 3:34 PM IST

ठाणे - एका ऑर्केस्ट्रा कम डान्स बारमध्ये दारूच्या बिलावरून पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जोरदार राडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील 'ताल' ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात राडेबाजांच्या टोळीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

भाजपाच्या माजी उपमहापौराचा लहान भाऊ

मंगल भवरसिंग चौहान, (वय ३०), रिकीन केतन गज्जर (वय २५), हरीश्याम कन्हैया (वय ४८), शेखर गणपत सरनोबत (वय २८), विक्रांत केळकर सर्व आरोपी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. उत्तम लक्ष्मण घोडे (वय ३१) हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी शेखर हा भाजपाचे माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांचा लहान भाऊ आहे.

१६ हजार ३२० रुपयांच्या बिलावरून वाद

कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक बारमध्ये वाद होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यातच काल रात्रीच्या सुमारास आरोपींचे टोळके मौजमजा करण्यासाठी कल्याण पश्चिम भागातील कल्याण मुरबाड रोडवर छाया टॉकीजच्या बाजूला असलेल्या ‘ताल’ नावाच्या ऑर्केस्ट्रा कम डान्स बारमध्ये दारू पिण्यासाठी आले होते. मध्यरात्रीपर्यंत सर्वच आरोपी दारू प्यायल्याने मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातच बार मॅनेजरने आरोपीकडे दारूच्या बिलाचे १६ हजार ३२० रुपये मागितल्याने आरोपी वाद घातला बारमधून बाहेर पडले. मात्र मॅनेजर बिलाची मागणी करीत असल्याचे पाहून आरोपी मंगलसिंग याने चल माझ्या कारजवळ तुला बिल देतो, असे म्हणून जवळच असलेल्या रिव्हॉल्व्हरचा मॅनेजरला धाक दाखवून शिवीगाळ करीत राडा घातला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

याप्रकरणी बार मॅनेजर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी सहा जणांना आज पहाटेच्या सुमारास अटक केली. आज या सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ढोले करीत आहेत.

Last Updated : Oct 19, 2021, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.