ETV Bharat / city

धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांत कोरोना काळात ५५९ बलात्काराच्या घटना

author img

By

Published : Feb 15, 2022, 6:43 PM IST

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात असलेल्या विविध ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५५९ बलात्कारांच्या घटना ( Incidents Of Rape In Corona Period In Thane ) घडल्या आहेत. यापैकी ३३५ अल्पवयीन मुलींवर तर, २२४ महिलांवर अशा एकूण ५५९ अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

ठाणे - कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात असलेल्या विविध ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५५९ बलात्कारांच्या घटना ( Incidents Of Rape In Corona Period In Thane ) घडल्या आहेत. यापैकी ३३५ अल्पवयीन मुलींवर तर, २२४ महिलांवर अशा एकूण ५५९ अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे, महिलांसह अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने नव्याने अंमलात आणलेल्या कायद्याची भीती नराधमांना नसल्याचे अत्याचारांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहेत. खळबळजनक बाब म्हणजे, डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराने जिल्हा हादरला होता.

हेही वाचा - Leopards Calf Head Stuck In Jar : बिबट्याच्या बछडयाला लागली तहान.. अन् डोकं अडकून बसला पाण्याच्या जारमध्ये

५५९ घटनेतील ९८ टक्के अत्याचारांच्या गुन्ह्यांची उकल

ठाणे पोलीस आयुक्त परीक्षेत्रात ५ पोलीस परीमंडळांचा समावेश असून यांच्या अंतर्गत ३५ पोलीस ठाणे आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने ७ महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे, सर्वच कामकाज व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिक घरातच होते. अशातही अत्याचाराच्या घटना घडत होत्या. दोन वर्षांच्या कोरोना काळात अत्याचारांच्या घडलेल्या घटना पाहता अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या बहुतांश घटनेत आरोपी नातेवाईक, शेजारी तर, काही घटनेत लग्नाचे आमिष दाखवून नराधमांनी अत्याचार केले आहेत. तर, महिलांमध्येही लग्नाच्या आमिषासह ब्लॅकमेलसह ठार मरण्याच्या धमकी देऊन नराधमांनी अत्याचार केले आहेत. या ५५९ घटनेतील ९८ टक्के अत्याचारांच्या गुन्ह्यांची उकल करून नराधमांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, यामध्ये सामूहिक बलात्कारांच्या घटनांचाही समावेश आहे.

जिल्ह्याला हादरून सोडणारे सामूहिक बलात्कार

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीत एका पंधरा वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर गेल्याच वर्षी ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेला ब्लॅकमेल करून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ३३ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. शिवाय पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केली. मात्र, या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने जिल्हा हादरला होता.

२०२० सालच्या तुलनेत २०२१ मध्ये अत्याचारांच्या घटनेत वाढ

दोन वर्षांच्या कोरोना काळात म्हणजे, २०२० सालात २१९ अत्याचारांचे गुन्हे घडले होते. यापैकी २१४ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी नराधमांना अटक केली. यामध्ये १३६ अल्पवयीन मुलींवर तर, ८३ महिलांवर अत्याचारांच्या अशा एकूण २१९ घटना २०२० साली घडल्या आहेत. मात्र, २०२० सालच्या तुलनेत २०२१ सालच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ३४० घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये १९९ अल्पवयीन मुलींवर तर, १४१ महिलांवर अत्याचार अशा एकूण ३४० घटनांची नोंद जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यत विविध पोलीस ठाण्यात करण्यात येऊन ३२९ गुन्ह्यांचा उकल करीत नराधमांना अटक करण्यात आली आहे.

लैंगिक छळवणुकीसह विनयभंगाच्या घटनेतही वाढ

२०२० साली विनयभंगासह लैंगिक छळवणुकींचे ४१२ गुन्हे घडले होते. यापैकी ३८० गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी ११२ अल्पवयीन मुली तर, २६८ महिलांनी गुन्हे दाखल केले. मात्र २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यत ५२० घटना विनयभंगासह लैंगिक छळवणुकीच्या घडल्या आहेत. यामध्ये ३७१ महिलांवर तर, १४९ अल्पवयीन मुलींवर विनयभंगासह लैंगिक छळवणूक झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात येऊन ४७५ गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Cricketer Tushar Deshpande : कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये 'या' दिग्गज खेळाडू सोबत खेळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.