ठाणे - ठाणे ते कल्याण दरम्यान मध्य रेल्वेच्या ५- ६ मार्गीकेच्या कामासाठी आज तब्बल ३६ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येत ( Mega Block On Central Railway ) आहे. हा ब्लॉक आज दुपारी २ वाजता सुरु ( Mega Block Started Thane To Diva ) झाला. सोमवारी मध्य रात्री 2 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. याच मार्गिकेच्या कामासाठी याआधी देखील अश्याच प्रकारचा ब्लॉक घेण्यात आला होता.
चार स्थानकांवर थांबणार नाही लोकल
आजच्या ३६ तासांच्या ब्लॉकमध्ये याच ट्रॅकवरील उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. तर, ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या स्थानकावरील रेल्वे सेवा संपूर्णपणे बंद असणार आहे. खासकरून कळवा, मुंब्रा, ठाकुर्ली व कोपर रेल्वे स्थनाकावर लोकल गाडी थांबणार नाही. तर गेली दहा वर्षे हे काम चालू आहे. हे काम जर पूर्ण झाले तर, रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'ने..
हजारो कर्मचाऱ्यांसह अत्याधुनिक यंत्रणा तैनात
या 36 तासाच्या मेगा ब्लॉकसाठी रेल्वे प्रशासनाने हजारो कामगार वर्ग कार्यरत केला ( Thousands Of Workers For Mega Block ) आहे. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात साधन सामुग्री, अत्याधुनिक यंत्रणाही तैनात आहे. ओव्हरहेड वायर, रेल्वे रुळ आणि त्यासाठी आवश्यक इतर सगळ्या सोयी याठिकाणी देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जेवण आणि पाण्याची सोय केल्यामुळे कर्मचारी दुसरीकडे कुठेही जाऊ नये, याची खबरदारी देखील रेल्वे प्रशासनाने ( Central Railway Administration ) घेतली आहे. ३६ तासांचा मेगाब्लॉक हा मोठा मेगाब्लॉक असून, त्यामुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्णत्वास येण्यासाठी मदत मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.