ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ( Kalyan Dombivli Municipal Corporation ) यापुढे एकही नवीन अनधिकृत बांधकाम होता कामा नये, याची खबरदारी घेण्याचा इशारा पोलिस अधिकारी व पालिका प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिला. विशेष म्हणजे यापूर्वी इमारती, बैठ्या चाळी अशी सुमारे २० हजार अनधिकृत बांधकामासंबधी ( Kalyan Dombivli Unauthorized Constructions ) १५ हजार अनधिकृत सदनिका धारकांना नोटीस ( Notice For Unauthorized Constructions ) बजावित कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगण्यात आले होते. तर केवळ ३५० अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी असताना पालिकेचे संबंधित अधिकारी कारवाईचे कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून आले आहे.
Kalyan Dombivli Unauthorized Constructions : कल्याण- डोंबिवली हद्दीत २० हजार अनधिकृत बांधकामे, गुन्हे केवळ ३५० जणांवरच दाखल.. - IAS Dr Vijay Suryavanshi
कल्याण-डोंबिवलीत २० हजार अनधिकृत बांधकामे ( Kalyan Dombivli Unauthorized Constructions ) असताना महानगरपालिका प्रशासनाने ( KDMC Administration ) मात्र अवघ्या ३५० जणांवर कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामासंबधी १५ हजार अनाधिकृत सदनिका धारकांना नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे.