ETV Bharat / city

मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बंटी - बबलीला बेड्या - बंटी - बबलीचा फर्दाफाश

मुंबई - नाशिक महामार्गावर एका मसाज पार्लरच्या स्पा सेंटरवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापा मारून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बंटी - बबलीचा फर्दाफाश केला आहे. या छापेमारीत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 22, 2021, 7:17 PM IST

Updated : Nov 22, 2021, 7:34 PM IST

ठाणे - मुंबई - नाशिक महामार्गावर एका मसाज पार्लरच्या स्पा सेंटरवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापा मारून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बंटी - बबलीचा फर्दाफाश केला आहे. या छापेमारीत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. तर, कोनगाव पोलीस ठाण्यात बंटी - बबलीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सपना शर्मा (वय ३४), अमित जगताप (वय २९) असे मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बंटी बबलीचे नाव आहे.

हेही वाचा - ST Workers Strike : परब यांनी एसटीच्या स्टेअरिंगवर बसावे, ...झाला तर डॉक्टर पाठवतो - नितेश राणे

बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट केले उघड

पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत मुबंई - नाशिक महामार्गावर भूमी वर्ल्ड कमर्शियल कॉम्प्लेक्समधील मेन गेटवर 'त्वचा वेलनेस युनिसेक्स स्पा' नावाचे आरोपीचे मसाज सेंटर आहे. या मसाज पार्लरमध्ये महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर मसाज पार्लर सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवला होता. त्यांनतर या ठिकाणी पीडित महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्री होताच पोलीस कर्मचाऱ्यांनी या मसाज सेंटरवर छापा मारून बंटी बबली जोडीला रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

आरोपींना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान चौधरी (वय ५७) यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींवर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांसह पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तर, दोन पीडित महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली असून, आज बंटी बबलीच्या जोडीला न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली.

हेही वाचा - ठाणे : धक्कादायक!!! आठव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा जागीच मृत्यू

Last Updated : Nov 22, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.