ETV Bharat / city

हजार खाटांचे नवीन कोविड रुग्णालय लवकरच ठाणेकरांच्या सेवेत : पालकमंत्री एकनाथ शिंदे - covid hospital thane

ठाण्यात उभारण्यात येत असलेल्या 1 जहार खाटांच्या कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली.

Eknath Shinde visit covid Hospital Thane
एकनाथ शिंदे कोविड रुग्णालय भेट ठाणे
author img

By

Published : Jun 11, 2020, 10:43 PM IST

ठाणे - शहर आणि परिसरात कोरोनाची साथ आटोक्यात आणता यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेत आहेत. तसेच प्रशासन आणि शासनाच्या प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने स्वतः आघाडीवर राहून कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व करत आहेत. ठाण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, उभारण्यात येत असलेल्या 1 हजार खाटांच्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... असं काय घडलं....लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचा केला खून, नंतर स्वत:ही घेतली फाशी

पालकमंत्री शिंदे सध्या कोविड रुग्णालये आणि क्वारंटाईन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला गेला होता. या रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा शिंदे यांनी आज घेतला. या रुग्णालयात ५०० खाटा विनाऑक्सिजन तर ५०० खाटा ऑक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असणार आहेत. याशिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा येथे असणार आहेत.

मागील दोन आठवडे हे रुग्णालय उभारण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. गुरुवारी शिंदेंनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा... महाविकास आघाडी सरकारने कोकणसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस

'हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपातील असले, तरिही जागतिक दर्जाच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.' असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच, गरज भासल्यास येथील क्षमता वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले. विक्रमी वेळेत या दर्जेदार रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास ठाण्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारची रुग्णालये उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.