सोलापूर - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर ( Nupur Sharmas on Prophet Muhammad ) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावर देशभर मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात देखील त्याचे पडसाद उमटले आहे. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने एमआयएम कार्यालयापासून ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चात सहभागी झालेल्या काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हुल्लडबाजी आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात ( Youth Riots MIM Morcha Police Mild Beating In Solapur ) आला.
जुम्माच्या नमाजनंतर मशिदीत आवाहन - भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशात मुस्लिम धर्मात संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम देशांनी देखील याचा विरोध केला आहे. याचे पडसाद आज ( 10 ) जून रोजी सोलापुरात देखील पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली. अनेक मशिदीत जुम्माच्या नमाजनंतर म्हणजेच शुक्रवारच्या नमाज नंतर मुस्लिम समुदायाला आवाहन करण्यात आले. त्यामुळे नमाजनंतर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते.
पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली - एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. मूक मोर्चा बाबत पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. हा मोर्चा एमआयएम कार्यालयापासून ते विजापूर वेस, बेगम पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय, असा काढला जाणार होता. पण, पोलिसांनी परवानगी नाकारली. एमआयएम ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर परवानगी दिली होती. अखेर या मार्गावरून मोर्चा काढण्यात आला
मोर्चात तरुणांची हुल्लडबाजी - एमआयएमच्या वतीन हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, यात तरुणांनी भाजपा विरोधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या बॅनरला चप्पल मारून विरोधात घोषणा दिल्या गेल्या. तसेच, मोर्चाचे नेतृत्व करणारे एमआयएमचे फारूक शाब्दी हे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आले असता पोलिसांनी मोजक्या जणांना जाण्यास सांगितले. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या गेटवर चढून जोरदारपणे घोषणाबाजी करत आत जाण्याचा प्रयत्न करत केला. तेव्हा पोलिसांनी तरुणांना अडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले.
हेही वाचा - Protest Against Nupur Sharma : सोलापुरात नुपूर शर्मा व जिंदाल विरोधात एमआयएमचा विराट मोर्चा