सोलापूर - युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रस्तिकात्मक पुतळ्याचे तिरडी काढली, आणि भर चौकात आणून दानवे यांचा पुतळा दहन केला.
तिरडी काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळा दहन केला -
काँग्रेस भवन येथुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढली. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर तिरडी काढली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळा दहन करून केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या.
पेट्रोल ओतून पुतळा दहन केला -
कार्यकर्त्यांनी दानवे यांचा पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणला, आणि पेट्रोल ओतून त्याला पेटवले. काही वेळातच आगीने भडका घेतला. रस्त्यावर पुतळा पेटवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांची तारांबळ -
काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांना याबाबत काहीही माहित नव्हते. गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी याबाबत माहिती देताच, पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.