सोलापूर- कर्नाटकमधील हिजाब वादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. 'एक नारी सबपर भारी'च्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम महिलांनी मोर्चा ( Women morcha in Solapur for Hijab ) काढला. एमआयएम पक्षाच्यावतीने सोलापुरात महिलांनी मोठा मोर्चा ( AMIM morcha to support Hijab ) काढण्यात आला.
कर्नाटक सरकारचा निषेध करत महिलांनी शाळा, महाविद्यालय असू दे किंवा बाजारपेठ असू दे, बुरखा आणि हिजाब घालणारच अशी कडवट प्रतिक्रिया देत कर्नाटक सरकारचा निषेध केला. भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी ( women protest BJP on Hijab Issue ) केली. सोलापुरात कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा आंदोलनाला परवानगी नसतानाही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात ( rally on Solapur collector office ) आला.
कर्नाटक सरकारचा सोलापुरात निषेध-
कर्नाटकमधील उडपी या शहरातून हिजाब वादाला सुरुवात झाली. याचे पडसाद सोलापुरात पहावयास मिळाले. एमआयएम पक्षाच्यावतीने महिलांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कर्नाटक सरकारने मुस्लिम महिलांवर अन्याय करत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली. यावेळी कर्नाटक सरकार आणि भाजपा सरकारचा विरोध केला. एमआयएम पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
एकीकडे मास्क आणि दुसरीकडे हिजाबला विरोध करतात-
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात थैमान घातले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मास्कला अनन्यसाधारण महत्व आले आहे. मास्कप्रमाणे असलेल्या हिजाबला विरोध केला जात आहे. कर्नाटक राज्यात हिजाबवरून धार्मिक राजकारण केले जात असल्याचा आरोप आंदोलनातील महिलांनी केला आहे. कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात काम करत आहे. केंद्र सरकार बेटी बचाव बेटी पढाओ, असा नारा देत आहे. तर मात्र हिजाबवरून शाळेत प्रवेश नाकारला जात आहे.
हेही वाचा-BJP State Office Mumbai : मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
हिजाबमध्ये आम्ही सुरक्षित-
हिजाब आणि बुरखामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. आम्हा महिलांना हिजाब मध्ये राहू द्या, असे एमआयएम पक्षाचे रेश्मा मुल्ला यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या मुख्य सीमेवर प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिजाब आणि बुरखा हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. हा हक्क संविधानाने दिला आहे. मात्र, कर्नाटक राज्यात बोम्मई राज्य सरकारने हिजाबबंदीचा हुकूम काढला आहे. याला मुस्लिम समाजातील महिलांचा तीव्र विरोध आहे. हिजाबवर बंदी घालता येणार नाही,असे सांगत प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी सोलापूर विजयपूर महामार्गावर रास्ता रोखून आंदोलन केले आहे.
हिजाब प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले-
सोलापुरसह महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या खालिद मणियार, अजित कुलकर्णी, जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन तरुणींनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर रास्ता रोको आंदोलन केले. कर्नाटक राज्यातील उडपी शहरातून हिजाब वाद संपूर्ण देशभरात पसरला आहे. देशातील उत्तर भारतात निवडणुका असल्याने हिजाब प्रकरणावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. प्रहार व एमआयएम आदी पक्ष थेट भाजपला विरोध करत आहेत.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर दोन तास वाहतूक रोखली-
प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तासभर वाहतूक रोखली होती. हिजाबला भाजपा सरकार रोखत आहे ,असा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन तास वाहतूक रोखण्यात आली होती.
-
Where there is a prescribed uniform in schools/colleges, it should be followed. Only education should be the focus at centers of education. Religious or political issues should not be brought to schools/colleges: Maharashtra Minister Aaditya Thackeray on Karnataka hijab row pic.twitter.com/eBFR7VIvh4
— ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Where there is a prescribed uniform in schools/colleges, it should be followed. Only education should be the focus at centers of education. Religious or political issues should not be brought to schools/colleges: Maharashtra Minister Aaditya Thackeray on Karnataka hijab row pic.twitter.com/eBFR7VIvh4
— ANI (@ANI) February 9, 2022Where there is a prescribed uniform in schools/colleges, it should be followed. Only education should be the focus at centers of education. Religious or political issues should not be brought to schools/colleges: Maharashtra Minister Aaditya Thackeray on Karnataka hijab row pic.twitter.com/eBFR7VIvh4
— ANI (@ANI) February 9, 2022
दरम्यान, शाळा व कॉलेजमध्ये असलेल्या गणवेशाचे पालन करावे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षण हे केंद्रस्थानी असायला हवे. धार्मिक किंवा राजकीय मुद्दे हे शाळा व महाविद्यालयांमध्ये आणू नयेत, असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.