ETV Bharat / city

Agitation Against Excise Department : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महिलांचा आक्रोश; ताडी दुकाने बंद करण्याची मागणी - राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महिलांचा आक्रोश

रसायन मिश्रीत ताडी पिऊन अनेक गोरगरिब महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. शहर आणि जिल्ह्यातील ताडी दुकाने बंद करा, असा नारा देत विडी घरकुल परिसरातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ( Agitation Against Excise Department ) मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला. माजी आमदार नरसय्या आडम ( Former MLA Narsayya Adam ) यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत, आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास 50 हजार विडी कामगार महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात घुसू, असा इशारा दिला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Feb 28, 2022, 5:11 PM IST

सोलापूर - रसायन मिश्रीत ताडी पिऊन अनेक गोरगरिब महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. शहर आणि जिल्ह्यातील ताडी दुकाने बंद करा, असा नारा देत विडी घरकुल परिसरातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ( Agitation Against Excise Department ) मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभाग ताडी दुकानांना परवानगी देत आहे. पण, हे ताडी दुकानदार विषारी रसायन मिश्रीत ताडी विक्री करत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागत आहे. शहर आणि जिल्ह्यातील ताडी दुकानांना परवानगी देऊ नका, असा नारा देत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. माजी आमदार नरसय्या आडम ( Former MLA Narsayya Adam ) यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत, आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास 50 हजार विडी कामगार महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात घुसू, असा इशारा दिला.

बोलताना माजी आमदार व आंदोलक महिला

ताडी दुकानांना परवाने वितरित - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ताडी दुकानदारांचे परवाने नूतनीकरण आणि नवीन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वितरित केले जात आहेत. शहर आणि जिल्ह्यात ताडीची झाडे असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे परवाने वितरित केले जात आहेत. पण, अनेक जण रसायन मिश्रीत ताडी व विषारी शिंदीची विक्री करत आहेत. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एक्साईज कार्यालयासमोर महिलांचा मोर्चा - विडी घरकुल परिसरातील अनेक महिलांनी विषारी शिंदी आणि रासायनिक ताडी विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात मोर्चा काढत राज्य उत्पादन शुल्क विभाग गाठले आणि घोषणाबाजी सुरू केली. माकप नेते नरसय्या आडम यांनी महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून विषारी ताडी व शिंदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. अशा विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करा, अन्यथा 50 हजार विडी कामगार महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करू, असा इशारा दिला.

हेही वाचा - Agitation Against Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्पाला माकपचा विरोध; सोलापुरात आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.