ETV Bharat / city

चंद्रभागेच्या पात्रात महिलेची रात्रीच्या अंधारात 6 तास मृत्यूशी झुंज

पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वर्धा जिल्ह्यातील महिला भाविक कांताबाई भुते या पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन घेऊन चंद्रभागा तीरावरील दगडी पुलावरून जात होत्या. मात्र कांता भुते यांचा तोल गेल्याने गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रात पडल्या. चंद्रभागेच्या पात्रात कांता भुते यांनी रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज दिली.

पंढरपूर
पंढरपूर
author img

By

Published : Jun 25, 2021, 4:26 PM IST

पंढरपूर - पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वर्धा जिल्ह्यातील महिला भाविक कांताबाई भुते या पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन घेऊन चंद्रभागा तीरावरील दगडी पुलावरून जात होत्या. मात्र कांता भुते यांचा तोल गेल्याने गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रात पडल्या. चंद्रभागेच्या पात्रात कांता भुते यांनी रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र एक कोळी समाजातील युवकाचा आवाज ऐकला त्यानंतर कोळी बांधवांनी एकत्र येत महिलेचे प्राण वाचवले.

चंद्रभागेच्या पात्रात महिलेची रात्रीच्या अंधारात 6 तास मृत्यूशी झुंज

चंद्रभागा नदी पात्रात तब्बल सहा तास मृत्यूशी झुंज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र येत्या 20 जुलै रोजी पांडुरंगाचा आषाढी सोहळा पार पडणार आहे. त्यावर राज्य शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी व वारी पोहोच करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कांता भूते हे आपल्या घरच्यांसोबत पंढरपुरात आल्या. विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले व चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी चंद्रभागेकडे आल्या. जुना दगडी पुलावरून चालत असतानाच त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यामध्ये पडल्या आणि पाण्याची खोली व पोहता येत नसल्याने तेथेच असलेल्या दगडाला त्या धरून बसल्या व मदतीसाठी सायंकाळच्या सहा वाजल्यापासून आवाज देत होत्या. मात्र त्यांचे आवाज कोणीही ऐकले नाही. जुन्या दगडी पुलावरून माणसांची व वाहतुकीची वर्दळ रात्रीच्या सुमारास कमी असते.

कांताबाई भुते यांच्या मदतीला विठ्ठलाच्या रूपात कृष्ण धावला
कांताबाई भुते हे या चंद्रभागा नदीपत्रात तब्बल सहा तास अडकून पडल्या होत्या. त्यांनी वाचवा-वाचवा या प्रकारची आरोळी दिली होती. त्याचवेळी कोळी समाजातील कृष्णा नेहतराव हे शेतामध्ये पाणी देण्यासाठी दगडी पुलावरून जात असताना त्यांना एका महिलेचा मदतीसाठी ओरडत असलेला आवाज आला. त्यांनी गाडी थांबवली आणि आवाज नेमका कुठून येतो हे पाहू लागली. त्यावेळी मित्र किरण यास फोन करून बोलावून घेतले व दोघांनी आवाज कुठून येत आहे. याचा शोध सुरू केला, तेव्हा दगडी पुल आला खालच्या बाजूला दगडाला धरून बसलेले एका महिलेचा आवाज येत होता. ठिकाणी मोबाईलची बॅटरी लावून बघितले असता एक महिला मला वाचवा, मला वाचवा असे ओरडू लागली. दरम्यान दोघांनी मिळून वाचवणे शक्य नसल्याने आपल्या मित्रांना बोलावून घेतले व सर्वांनी मिळून सदर महिलेला पाण्यातून बाहेर काढत पुलाच्या वर आणले. सर्व कोळी समाजातील समाजातील बांधवांनी एकत्र येऊन कांताबाई भुते यांचा जीव वाचवला. त्यानंतर सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून लावून घेऊन सर्व हकीकत सांगितली. कुटुंबाकडून कोळी समाजातील बांधवांचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा - भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.