सोलापूर - वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सकाळी सोलापुरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश येथील एका दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन झाले. परंतू पोलिसानी पुतळा जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
14 सप्टेंबर 2020 ला उत्तर प्रदेश राज्यातील एका दलित मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता. दोनच दिवसांपूर्वी या पीडित मुलीचा उपचारा दरम्यान मृत्य झाला. त्याच्या परिवारा विनाच पीडित मुलीचा अंतिमसंस्कार सरकारने उरकून टाकला. या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या नराधमांना फाशीची मागणी केली जात आहे.
सोलापुरात वंचित बहुजन आघाडीकडून योगी आदित्यनाथ यांचा गुरुवारी सकाळी पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी 1 ऑक्टोबरला सकाळी 12 वाजल्यापासून आंबेडकर चौक(पार्क चौक) येथे पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वंचितचे सर्व नेते आंबेडकर चौकात जमले होते. अचानक गनिमी कावा पद्धतीने वंचित आघाडीचे गौतम चंदनशिवे यांनी जोरदार घोषणा देत उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा धावत आणला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पकडा-पकडी करून योगीचा प्रतिकात्मक पुतळा काढून घेतला व निषेध व्यक्त करा, पुतळा जाळपोळ करू नका अशा सूचना दिल्या. ही पकडापकडी होत असताना एकच गोंधळ उडाला होता.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, प्रा. वंदना गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, बबन शिंदे, मंदाकिनी शिंगे, रवि थोरात, चाचा सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.