ETV Bharat / city

दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ - water lever

या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील नदी खोऱ्यात याआधी दमदार पाऊस झाला आणि आताही सुरू आहे. त्यामळे पाण्याचा मोठा विसर्ग काळमोडी, खडकवासला, चासकमान, आद्रा, कासारसाई या धरणात  पाण्याचा मोठा विसर्ग आला. तो प्रवाह आता पुढे उजनी धरणात येत आहे.

उजणी धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे.
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:16 PM IST

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा प्रवास आज दुपारनंतर प्लस पातळीकडे सुरू झाला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळणार आहे.

दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

चालुवर्षी उजनी धरण वजा 59.88 टक्क्यांवर पोहचले होते. या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील नदी खोऱ्यात याआधी दमदार पाऊस झाला आणि आताही सुरू आहे. त्यामळे पाण्याचा मोठा विसर्ग काळमोडी, खडकवासला, चासकमान, आद्रा, कासारसाई या धरणात पाण्याचा मोठा विसर्ग आला. तो प्रवाह आता पुढे उजनी धरणात येत आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी झालेल्या धरणात जवळपास 60 टक्के पाणी आलेले आहे. तसेच आणखी 100 टक्के पाणी येण्याची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आहे. सध्या बंडगार्डनमधून 26824 क्यूसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. मार्गात येणाऱ्या पाण्याची भर पडून हा विसर्ग आणखी वाढणार आहे.

गेल्यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण पाण्याच्या साठमारीमुळे मायनसमध्ये गेले होते.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद आणि काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेती पिकांना तसेच पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसला होता. त्यातून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त अन उजनीवर विसंबून असणाऱ्या जनतेचे संपूर्ण लक्ष उजनीच्या पाणीसाठ्यांकडे लागले होते. आता धरणाची वाटचाल प्लस साठ्याकडे सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Intro:सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा प्रवास आज दुपारनंतर प्लस पातळीकडे सुरु झाला आहे. त्यामुळं दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला कांही अंशी दिलासा मिळणार आहे.

Body:चालुवर्षी हे धरण वजा 59.88 टक्क्यांवर पोहचलं होतं. पण या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील नदी खोऱ्यात आधी झालेल्या अन आता सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पाण्याचा मोठा विसर्ग काळमोडी,खडकवासला, चासकमान,आद्रा,कासारसाई या धरणांत 60 टक्क्यांवर पाण्याचा मोठा विसर्ग आला...तो प्रवाह आता पुढे उजनी धरणात येत आहे. त्यामुळं मायनस मध्ये गेलेल्या धरणांत जवळपास 60 टक्के पाणी आलेलं आहे. आणखी 100 टक्के पाणी येण्याची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आहे.सध्या बंडगार्डनमधून 26824 क्यूसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. मार्गात येणाऱ्या पाण्याची भर पडून हा विसर्ग आणखी वाढणार आहे.

Conclusion:गेल्यावर्षी 110 टक्के भरलेलं उजनी धरण पाण्याच्या साठमारीमुळं मायनसमध्ये गेलं होतं.त्यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यासह उस्मानाबाद आणि कांही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेती पिकांना, पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसला होता.त्यातून तीव्र पाणीटंचाईनं त्रस्त अन उजनीवर विसंबून असणाऱ्या जनतेचं संपूर्ण उजनीच्या पाणीसाठ्यांकड लागलं होतं.आता धरणाची वाटचाल प्लस साठयाकडं सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.