ETV Bharat / city

माढ्यात मारहाण, दमदाटीच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - अर्वाच्य भाषेत शिविगाळ

वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोलापूरसह राज्यभरात होत असलेल्या मारहाण आणि दमदाटीच्या घटनेचा निषेध करीत माढा तालुक्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील प्रशासनाला इशारा दिला आहे.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : May 29, 2021, 5:45 PM IST

सोलापूर - कोविडचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवक अहोरात्र झटत आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोलापूरसह राज्यभरात होत असलेल्या मारहाण आणि दमदाटीच्या घटनेचा निषेध करीत माढा तालुक्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शुक्रवार (दि. २८ मे) रोजी कामबंद आंदोलन ठेवून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील प्रशासनाला इशारा दिला आहे.

डॉक्टरांच्या शिष्टमंडळानी दिले निवेदन

प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल शिंदे, डाॅ. अमोल माने, डाॅ. प्रशांत पलंगे, डाॅ. शरद थोरात, डाॅ. धनराज कदम, डाॅ. राखी भंडारे या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दैनंदिन काम करीत असताना होणारा त्रास, दमदाटी आणि राजकीय हस्तक्षेपाबाबतच्या तक्रारी मांडून लेखी निवेदन देऊन मागण्या मांडल्या आहेत.

डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. कोरोनाच्या महामारीत सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेविकांसह सर्वच आरोग्य यंत्रणेतील घटक स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत. करमाळा तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वर्धा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ झाली आहे.

सरपंचाच्या पतीकडून जीवे मारण्याची धमकी

माढा तालुक्यातील रोपळे (कव्हे) येथील डॉ. राखी भंडारे यांनी गावच्या सरपंचाच्या पतीच्या कुर्डूवाडीच्या मित्राला लसीकरणासाठी रांगेत उभा राहण्यास सांगितले. यामुळे सरपंचाच्या पतीने डाॅ. भंडारी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तात्यासाहेब गोडगे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना २७ मे रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास रोपळे (क) प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.

आशा वर्कर मेहतांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

कव्हे येथील आशा वर्कर शोभा प्रवीण मेहता यांनी घेतलेल्या विलगीकरण जबाबाच्या कारणावरुन आशा वर्कर मेहता यांना घरी येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ आणि दमदाटी केल्याची घटना घडली. कव्हे गावातील सुधीर रंगनाथ चोपडे यांच्यावर देखील मारहाणीचा कुर्डूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. माढा तालुक्यातील या २ घटनांसह राज्यातील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या घटनांचा निषेध नोंदवण्यात आला. तत्परतेने मागण्या मान्य करण्याची विनंती प्रशासनाकडे लेखी निवेदनातून डॉक्टरांनी केली आहे.

आशा सेविका शोभा मेहतांची प्रतिक्रिया

जीव धोक्यात घालून तुटपुंज्या पगारावर आम्ही काम करतो. गावातील कोरोना महामारीची माहिती देताना तर कधी-कधी जेवण देखील करायला वेळ मिळत नाही. समाजाकडून आम्हाला सहकार्याची गरज असते. मात्र मी आमच्या गावातील कोरोनाबाधित महिलेच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी गेले असता घरी येऊन मला लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह शिविगाळ झाली. प्रामाणिकपणे काम केल्याचे फलित समाजाने हे दिले, अशी भावुक प्रतिक्रिया आशा सेविका शोभा मेहता यांनी बोलताना व्यक्त केली.

या आहेत मागण्या

  • आरोग्य खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण आणि दमदाटी घटनाच्या प्रकरणात पोलिसांनी संबधितावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
  • ग्रामीण भागात लसीकरण करताना दबावतंत्र वापरण्यात येते. अपात्र लाभार्थ्यांना लसीकरण करण्याबाबत दबाव टाकून ब्लॅकमेल केले जात आहे.
  • लसीकरणासाठी करण्यात येणारी डेटा एन्ट्री सारखे तांत्रिक काम अन्य यंत्रणेकडून करुन घेण्यात यावे.
  • सर्व आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनामार्फत जोखीम निधी देण्यात यावा व दर महिन्याचे वेतन वेळेत व्हावे.
  • आशा सेविका या तुटपुंज्या भत्यावर सर्व भागात काम करीत आहेत. त्यांच्या मासिक भत्यामध्ये शासनाने वाढ करावी.
  • माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे (कव्हे) येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राखी भंडारी यांना गावच्या सरपंच प्रतिनिधीकडून शिविगाळ करुन धमकावण्यात आले. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
  • लसीकरणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा. यासह अन्य मागण्या निवेदनात नमुद केल्या आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी धोरण निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.