ETV Bharat / city

पंढरपुरात चैत्र वारी रद्द; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोलिसांचा कडक बंदोबस्त - पंढरपूर चैत्र वारी पोलीस बंदोबस्त

राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत धार्मिक स्थळे बंद केली आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरसुद्धा बंद आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेची 23 एप्रिलला होणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे.

Pandharpur Chaitra wari
Pandharpur Chaitra wari
author img

By

Published : Apr 22, 2021, 6:40 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत धार्मिक स्थळे बंद केली आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरसुद्धा बंद आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेची 23 एप्रिलला होणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अकराशे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला आहे. 20 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

भाविकांना पंढरपूरमध्ये येण्यास बंदी -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 5 एप्रिलपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद केली आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर 5 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. 23 एप्रिलला होणारी चैत्री यात्रा प्रतीकात्मक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. मात्र, परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी व भाविकांना या काळात बंदी घालण्यात आली आहे. चैत्र वारी निमित्त पंढरपुरात भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

अकराशे पोलिसांचा चोख बंदोबस्त -

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून 500 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, एसआरपी कंपनी, 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 5 पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पाेलीस निरीक्षक, 15 महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा बंदोबस्त तैनात केला आहे. 24 एप्रिलपर्यंत हा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

याहीवर्षी चैत्र वारी रद्द -

विठ्ठल रुक्मिणी मातेची चैत्र वारी चार मोठ्या वाऱ्या पैकी एक आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची चैत्री यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आषाढी, कार्तिकी, माघवारी जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षभरामध्ये पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चार यात्रापैकी कोणतीही यात्रा झाली नाही. मात्र राज्य सरकारकडून दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले केले होते. त्यामध्ये मंदिर समितीला कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मुखदर्शनाची सोय करावी अशी सूचना दिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाच एप्रिलपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.