ETV Bharat / city

पंढरपूरमध्ये कोरोना परिस्थितीबाबत प्रांतधिकाऱ्यांकडून कठोर उपाययोजना - कोरोनाची दुसरी लाट

पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाकडून कठोर उपाययोजनाही करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रुग्णासोबत येत असल्यामुळे धोका वाढत आहे. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड सेंटर किंवा कोविड हॉस्पिटल जवळ न थांबता घरी जाण्याचे आवाहन पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नातेवाईकांना केले आहे.

प्रांतधिकाऱ्यांकडून कठोर उपाययोजना
प्रांतधिकाऱ्यांकडून कठोर उपाययोजना
author img

By

Published : May 8, 2021, 8:00 PM IST

पंढरपूर - पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाकडून कठोर उपाययोजनाही करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रुग्णासोबत येत असल्यामुळे धोका वाढत आहे. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड सेंटर किंवा कोविड हॉस्पिटल जवळ न थांबता घरी जाण्याचे आवाहन पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नातेवाईकांना केले आहे.

पंढरपूरमध्ये कोरोना परिस्थितीबाबत प्रांतधिकाऱ्यांकडून कठोर उपाययोजना

प्रांत कार्यालयात कोरोना संदर्भातील कक्षाची उभारणी
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांना योग्य ते वेळेवर उपचार मिळावेत, या हेतूने पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रांत कार्यालयात कोरोना संदर्भातील पक्षाची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना संदर्भातील विविध अडचणी सोडवण्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोविड हॉस्पिटलची माहिती, कोविड केअर सेंटरची माहिती, कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलाबाबत तक्रार अशा निवारण कक्षात करण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून कठोर उपाययोजना
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना विषाणूची संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर परिसरात न थांबण्याचे आव्हान सचिन ढोले यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेण्याचा सल्लाही नातेवाईकांना दिला आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी आव्हान केले आहे.

हेही वाचा - देशातील ऑक्सिजनच्या वितरणाकरिता नॅशनल टास्क फोर्स नेमा- केंद्राला 'सर्वोच्च' आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.