सोलापूर - सीना नदीवर मोहोळ तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. होळ तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांना सीना नदीपात्रातून सार्वजनिक पाणी पुरवठा ( water ) केला जातो. तर दुसरीकडे 40 ते 45 हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहराला ही याच सीना नदीच्या माध्यमातून आष्टे येथील बंधाऱ्यातून पाणी पुरवठा ( Water supply ) केला जातो.पण नदीचे सर्व पाणी काळे, दूषित झाल्याने ( Sina river water contaminated ) ) ग्रामस्थांनी नदी किनारी एकच गर्दी केली आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांवर व जनावरांवर दुष्परिणाम होतील का असा प्रश्न पडला आहे.
हेहीवाचा- Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद
ग्रामस्थांमध्ये भीती भीतीदायक वातावरण- दोन दिवसांपासून सीना नदीत वाहणाऱ्या पाण्याने आपला रंग बदलला आहे.याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या लक्षात येताच सोशल मीडियावर काळ्या पाणी बाबत चर्चा सुरू झाली. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांना व प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली. तसेच त्या पाण्याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर टाकले.नदीचे पाणी केमिकल मिसळलेल्या पाण्याप्रमाणे दिसत आहे, या पाण्यामुळे माणसाच्या किंवा जनावरांच्या जीविताला काही धोका तर निर्माण होणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांनी सीना नदीकाठावरील शेतकरी, नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
प्रदूषण मंडळाचे अधिकर्यांनी पाण्याचे नमुने घेतले - सीना नदीपात्रातील पाणी वाहत असताना रंग बदललेले पाणी आहे त्याच स्थितीत कसे राहिले आहे? या पाण्यात एखाद्या कारखान्याची मळी किंवा केमिकल मिसळले आहे की काय? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. या पाण्यात नेमके काय मिसळले याबाबतची माहिती घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी ननवरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली आहे.
हेहीवाचा- Singapore Open 2022 : फुलराणीचा नवा विक्रम; सिंधूने पहिल्यांदाच पटकावले सिंगापूर ओपनचे जेतेपद