ETV Bharat / city

सोलापुरात कुंटणखाण्यावर छापा; चार पीडित महिलांची सुटका, दोघींना अटक - वेश्या व्यवसायावर छापा

पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले आणि त्या बनावट ग्राहकाला कुंटणखाण्यावर पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापेमारी केली.

solapur
सोलापूर पोलीस आयुक्तालय
author img

By

Published : Mar 17, 2021, 7:47 AM IST

Updated : Mar 17, 2021, 9:15 AM IST

सोलापूर- अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक खात्यातील पोलिसांनी शहराच्या मधोमध चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारला. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील मदर इंडिया झोपडपट्टी येथील हुडको कॉलनी येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या दोन संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे.

सोलापुरात कुंटणखाण्यावर छापा

उषा मुकेश चोपडे(वय 60 वर्ष ,रा.मदर इंडिया झोपडपट्टी,हुडको कॉलनी,सोलापूर) आणि अनिता सुधीर गवळी (वय 56 वर्ष,रा ,मदर इंडिया झोपडपट्टी,हुडको कॉलनी,सोलापूर) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित महिलांचे नावे आहेत. या दोन्ही महिलांवर वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या मधोमध कुंटणखाना-

सोलापूर शहरात मधोमध सुरू असलेल्या कुंटणखाण्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा करून बनावट ग्राहक तयार केले आणि त्या बनावट ग्राहकाला कुंटणखाण्यावर पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापेमारी केली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. या चारही महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी डांबून ठेवले होते. त्यांच्या कमाईवर २ आरोपी महिला स्वतःची उपजीविका चालवत होत्या.

ही कारवाई पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पीएसआय प्रशांत क्षीरसागर, पोहेको राजेंद्र बंडगर, सुवर्णा काळे, इनामदार, महादेव बंडगर, मंडलिक, भुजबळ, आदींचा या कारवाईत सहभाग होता.

Last Updated : Mar 17, 2021, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.