सोलापूर - दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोलापुरात सिटूच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सिटू चे राज्यसचिव युसूफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन करताना सिटूच्या कार्यकर्त्यांना सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे.
बळाचा वापर करून घेतले ताब्यात-
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात तीन काळे कायदे पारित केले. त्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. घोषणा देताना पोलिसांनी बळाचा वापर करून सिटूच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
सिटूच्या कार्यकर्त्यांना केली अटक-
अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, विजय हरसुरे, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते, युसूफ शेख उर्फ मेजर, युसूफ रजाक शेख, दाऊद शेख, जावेद सगरी,जुबेर सगरी, श्रीनिवास गड्डम, अशोक बल्ला, हसन शेख, वीरेंद्र पद्मा, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, चण्णाम्मा भंडारे, व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता, अकिल शेख, आसिफ पठाण, दत्ता चव्हाण आदींसह अनेक कार्यकर्त्यांवर सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा- नामांतरावरून तापले महाराष्ट्रातील राजकारण