सोलापूर - राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करावा तसेच सरकारी कार्यालयांमध्ये तसेच विविध ठिकाणी हा दिन साजरा करावा असे पत्र शासनाने दिले आहे. मात्र सोलापूर एसटी स्टँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले ( Not worship of Chhatrapati Shivaji Maharaj image ) नाही ही बाब शिवसैनिकांना लक्षात आल्यानंतर संताप व्यक्त ( Solapur Shiv Sainiks angry ) केला. व बस स्थानकातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आगार प्रमुखांनी देखील दिलगिरी व्यक्त केली.
बसस्थानकात शिवसैनिकांचा गोंधळ - सोलापूर बस स्टँड आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूजा करण्यात आली नव्हती. ही बाब समजताच शिवसैनिक संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोलापूर आगार प्रमुखाच्या केबिनमध्ये जाऊन गोंधळ घातला. एसटी महामंडळाचे काम बंद पाडले. फाईली व रजिस्टर्स फेकून दिल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याच्या सूचना केल्या.
दिलगिरी व्यक्त करून प्रतिमेचे पूजन - सोलापूर बसस्थानकात गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगार प्रमुख तसेच एसटी मंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन करून दिलगिरी व्यक्त केली. वास्तविक पाहता शासनाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे परिपत्रक काढले असताना देखील एसटी महामंडळाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पूजन केले नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर यांनी आपली भूमिका मांडताना जर यापुढे अशी घटना घडली तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल