सोलापूर : शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे .शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे फक्त एकनाथ शिंदे असतील.निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देईल असा गौप्यस्फोट केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे व युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अब्दुल सत्तार यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले (Sharad Kolis venomous criticism on Abdul Sattar) आहे.
अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोग जर पक्षपाती करत निर्णय दिला, तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात दंगल उसळेल- शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने 50 खोके एकदम ओके कार्यक्रम केले तर,महाराष्ट्रात दंगल उसळेल. शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर 50 खोके एकदम ओके कार्यक्रम केला तर महाराष्ट्र राज्यात दंगल उसळेल. राज्य भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. याचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोग जर एकनाथ शिंदे गटाला दिलं तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील.