सोलापूर- सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. गुरुवारी शहरात 71 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2813 झाली, तर मृतांची संख्या 280 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 974 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1559 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर शहरात गुरुवारी 193 अहवाल प्राप्त झाले, यात 122 अहवाल निगेटिव्ह तर 71 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 45 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. शहरातील 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी 204 अहवाल प्राप्त झाले. यात 189 निगेटिव्ह तर 15 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यामध्ये 11 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात 24 जण कोरोनामुक्त झाले. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत सोलापूर शहरात 2397 पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये 416 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. सोलापूर शहरात गुरुवारपर्यंत मृतांची संख्या 261 आहे तर ग्रामीणमध्ये मृतांची संख्या 19 आहे. ग्रामीणमध्ये अक्कलकोट सर्वात वरच्या स्थानी आहे. तर मंगळवेढा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही.