ETV Bharat / city

विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करा- सकल मराठा समाजाची मागणी - vijay wadettiwar controversy statement against Maratha

विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे जबाबदार मंत्री आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

सकल मराठा समाजाची मागणी
सकल मराठा समाजाची मागणी
author img

By

Published : Sep 2, 2021, 7:55 PM IST

Updated : Sep 2, 2021, 8:15 PM IST

सोलापूर- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या निर्धार मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत घेतली आहे.

विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे जबाबदार मंत्री आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करा
नारायण राणेंप्रमाणे विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलल्यावर जशी कारवाई तशीच कारवाई राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर करावी, अशी सकल मराठा समाजाने केली आहे.

हेही वाचा-World War II : दुसऱ्या महायुद्धाला आज 76 वर्ष पूर्ण; आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...

विजय वडेट्टीवार यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप
जुळे सोलापुरातील गंगा लॉन्स येथे 31 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. याचे आयोजन शरद कोळी व हसीब नदाफ आदींनी केले होते. यावेळी काँग्रेसमधील आमदर प्रणिती शिंदे, राजेश राठोड, माजी आमदार नरसय्या आडम, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाषणादरम्यान होता जिवा म्हणून वाचला शिवा असे वक्तव्यकरून संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचे सकलम मराठा समाजाने म्हटले आहे. ओबीसी आरक्षण नाही मिळाले तर धनगरांची काठी हातात घेऊन मारू, असे वक्तव्य केले. यावरून सोलापुरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा-भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याला तस्कराला बीएसएफकडून अटक

अन्यथा काँग्रेसला जागा दाखवून देऊ-
विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे मंत्री आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण, मराठा समाजाने काँग्रेसला वेळोवेळी साथ दिली आहे. तसेच ओबीसी मेळाव्यात काँग्रेसचे राजेश राठोड आणि प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई न झाल्यास सकल मराठा समाज काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देईल, अशी खरमरीत टीका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसचा निषेध केला आहे.

हेही वाचा-तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, अॅड श्रीरंग लाळे, प्रा गणेश देशमुख, संतोष गायकवाड व विजय पोखरकर आदी उपस्थित होते.

सोलापूर- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या निर्धार मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत घेतली आहे.

विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे जबाबदार मंत्री आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

विजय वडेट्टीवारांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करा
नारायण राणेंप्रमाणे विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलल्यावर जशी कारवाई तशीच कारवाई राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर करावी, अशी सकल मराठा समाजाने केली आहे.

हेही वाचा-World War II : दुसऱ्या महायुद्धाला आज 76 वर्ष पूर्ण; आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...

विजय वडेट्टीवार यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप
जुळे सोलापुरातील गंगा लॉन्स येथे 31 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. याचे आयोजन शरद कोळी व हसीब नदाफ आदींनी केले होते. यावेळी काँग्रेसमधील आमदर प्रणिती शिंदे, राजेश राठोड, माजी आमदार नरसय्या आडम, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाषणादरम्यान होता जिवा म्हणून वाचला शिवा असे वक्तव्यकरून संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचे सकलम मराठा समाजाने म्हटले आहे. ओबीसी आरक्षण नाही मिळाले तर धनगरांची काठी हातात घेऊन मारू, असे वक्तव्य केले. यावरून सोलापुरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा-भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याला तस्कराला बीएसएफकडून अटक

अन्यथा काँग्रेसला जागा दाखवून देऊ-
विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे मंत्री आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण, मराठा समाजाने काँग्रेसला वेळोवेळी साथ दिली आहे. तसेच ओबीसी मेळाव्यात काँग्रेसचे राजेश राठोड आणि प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई न झाल्यास सकल मराठा समाज काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देईल, अशी खरमरीत टीका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसचा निषेध केला आहे.

हेही वाचा-तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, अॅड श्रीरंग लाळे, प्रा गणेश देशमुख, संतोष गायकवाड व विजय पोखरकर आदी उपस्थित होते.

Last Updated : Sep 2, 2021, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.