ETV Bharat / city

ज्येष्ठ नागरिकांना विलगीकरण केंद्रात नेतानाच्या व्हिडिओबाबत अफवा; 'ही' आहे वस्तुस्थिती

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाल्याची घटना एका मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्याचे व्हिडीओ समाज माध्यमातून पसरवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्तीने घेऊन जात असल्याची अफवा पसरल्याने शहरात भीतीचे वातवरण पसरले आहे.

रुग्णाचे नातेवाईक व कर्मचारी यांच्यामधील वाद

author img

By

Published : Jul 23, 2020, 8:30 PM IST

सोलापूर – महापालिकेचे कर्मचीरी विलगीकरण केंद्रात घेऊन जाताना शहरातील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला. त्यामधून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची आरोग्य खात्याचे कर्मचारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा विपर्यास करत ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्तीने विलगीकरणात नेले जात असल्याची अफवा समाज माध्यमातून पसरवली जात आहे.

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाल्याची घटना एका मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून पसरवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्तीने घेऊन जात असल्याची अफवा पसरल्याने शहरात भीतीचे वातवरण पसरले आहे.

बुधवारी सकाळी सोलापुरातील नई जिंदगी या भागातील सिद्धेश्वरनगरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या घरी जावून महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व सदस्यांना विलगीकरण केंद्रात जावे लागेल, अशी सूचना दिली. तसेच रुग्णाच्या इतर नातेवाईकांना व त्याच्या संपर्कातील इतर नागरिकांना विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रत्यक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना व संपर्कातील इतर नागरिकांना विलगीकरण केंद्रात घेऊन जाताना त्यांनी कर्मचाऱ्यांना विरोध केला. रस्त्यावरच हा वाद उफाळून आला. त्यामुळे आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदतीसाठी पाचारण केले. या वादाचे अरेरावीच्या भाषेमध्ये रुपांतर झाले. शेवटी कर्मचाऱ्यांनी नाईनालाजाने दमदाटी करत रुग्णांच्या नातेवाईकांना व त्याच्या संपर्कातील इतर नागरिकांना विलगीकरण केंद्रात नेले.

अफवेकडे करा दुर्लक्ष-

सोलापूर महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी ज्येष्ठ नागरिकांची चौकशी करत आहेत. त्यांना बळजबरी करत घेऊन जात आहेत, अशी समाज माध्यमातून अफवा पसरविली जात आहे. या व्हिडीओची ईटीव्हीच्यावतीने सत्यत्या पडताळणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांकडून सर्व हकीकत जाणून घेण्यात घेतली. त्यावेळी प्रत्यक्ष वस्तुस्थिती समोर आली. ज्येष्ठ नागरिकांनी कोणतेही कर्मचारी विलगीकरणात नेण्यासाठी जबरदस्ती करत नसल्याची माहिती मिळाली. परंतु कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दमदाटी करत विलगीकरणात नेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान याबाबत बोलताना स्थानिक नगरसेवक मौलाली सय्यद यांनी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असे नागरिकांना आवाहन केले. नागरिकांनी खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणताही कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्तीने विलगीकरण केंद्रात नेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.