ETV Bharat / city

सोलापुरात रास्ता रोको करणाऱ्या माकपच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले; कार्यालयासमोर केले आंदोलन - माजी आमदार नरसय्या आडम

माकपकडून आज शुक्रवारी सोलापुरात विज बिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन रोखले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

police-denied-permission-for-protest-to-communist-party-in-solapur
आंदोलन
author img

By

Published : Mar 19, 2021, 3:13 PM IST

सोलापूर - सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने शुक्रवारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, प्रशासनाने सिटूच्या कार्यालयालगत पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलनकर्त्यांना रास्तारोको करण्यास मज्जाव केला. माजी आमदार नरसय्या आडम व सिटूचे राज्य महासचिव एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली टाळेबंदीच्या कालावधीतील वीजशुल्क माफ करा, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार होते.

आंदोलकांची घोषणाबाजी -

पोलिसांनी आंदोलनाची परवानगी न दिल्याने कार्यकर्त्यांनी दत्त नगर आणि लाल बावटा चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच वीज विधेयक 2021 मागे घ्या, टाळेबंदी काळातील वीज शुल्क माफ करा, खंडित वीज पुरवठा पूर्ववत करा, जनता विरोधी सरकार हाणून पाडा, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, कामगार एकजूटीचा विजय असो घोषणा देऊन पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.

सोलापुरात रास्ता रोको करणाऱ्या माकपच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले..

इतर राज्यांप्रमाणे लॉकडाऊन काळातील सवलती जाहीर करण्याची मागणी -

माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले की, महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यांनी लॉकडाऊन काळात वीज शुल्कात सवलत दिली. उदरनिर्वाहासाठी ५ ते १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्यही केले. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या विजेची तोडणी करून त्यांचे जीवन अंधकाराकडे नेत आहेत. वीज वितरण कंपनीला कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारणाऱ्या दिवाळखोरांना सवलत देत आहेत. जाणीवपूर्वक ही विसंगती निर्माण केल्याची टीका आडम यांनी केली.

सरकार विरोधात रस्त्यावर उतरून लढू-

सिटूचे नेते अ‌ॅड. एम. एच. शेख म्हणाले की, सरकार लोकांच्या भावनांचा व आर्थिक कुवतीचा विचार न करता चुकीचे धोरण राबवत आहे. याला जनतेने आक्रमकतेने व रस्त्यावरच्या लढाईने उत्तर दिले पाहिजे.

यावेळी आंदोलनात सिटूचे व माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनावेळी अ‌‌ॅड. एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर) चन्नाप्पा सावळगी, रा. गो. म्हेत्रेस, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, मुरलीधर सुंचू, किशोर मेहता, बाबू कोकणे, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, श्रीनिवास गड्डम, अशोक बल्ला, सनी शेट्टी, वासिम मुल्ला, बाळकृष्ण मल्याळ, अकिल शेख, विजय हरसुरे, नागेश म्हेत्रे, बालाजी गुंडे, बजरंग गायकवाड, अमोल काशीद, दाउद शेख, नरेश दुगाणे, शहाबुद्दीन शेख, रवि गेंटयाल, प्रवीण आडम, विठ्ठल द्यावारकोंडा, श्रीनिवास तंगद्गी, राम मरेड्डी, शाम आडम, मल्लेशम कारमपुरी, किशोर गुंडला आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - ऊर्जा मंत्र्यांच्या बंगल्यात कोट्यवधीचा 'झगमगाट'; भाजपचा आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.