ETV Bharat / city

चक्कर आलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या कोरोना चाचणीवरून संभ्रम - solapur corona death news

हिम्मतलाल शेख यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरांनी संपूर्ण तयारी केली होती. पण 17 मार्च रोजी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि पुन्हा त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले. पण त्यांचा मृत्यू झाला.

solapur civil hospital
solapur civil hospital
author img

By

Published : Mar 18, 2021, 5:26 PM IST

Updated : Mar 18, 2021, 5:51 PM IST

सोलापूर - छत्रपती शिवाजीमहाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. चक्कर आलेल्या रुग्णाची कोरोना टेस्ट सुरुवातीला पॉझिटिव्ह आली आणि बारा दिवस उपचार केल्यानंतर रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र त्याचा अचानक मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी पुन्हा त्याला पॉझिटिव्ह घोषित केले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांत मात्र संतापाची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून मृत रुग्णाचे नातेवाईक संभ्रमात पडले आहेत.

निगेटिव्ह आलेला रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह कसा?

चक्कर आल्यामुळे उपचारासाठी दाखल केले आणि आरटीपीसीआर टेस्टमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. हिम्मतलाल दस्तगिर शेख (वय 54, रा. भाग्यलक्ष्मी नगर, नई जिंदगी, सोलापूर) यांना 7 मार्च रोजी राहत्या घरी चक्कर आली होती. चक्कर का आली याचा उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी ताबडतोब त्यास कोरोना वॉर्डात उपचारासाठी दाखल केले. तबल 12 दिवस उपचार केले. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी 17 मार्च रोजी रॅपिड टेस्ट केली. त्यामध्ये कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हिम्मतलाल शेख यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली.

अचानक खालावली प्रकृती

हिम्मतलाल शेख यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरांनी संपूर्ण तयारी केली होती. पण 17 मार्च रोजी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि पुन्हा त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले. पण त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांना त्याबाबत 17 मार्च रोजी डॉक्टरांनी मृत झाल्याबाबत माहिती दिली आणि पोस्टमॉर्टम करून मृतदेह ताब्यात घेण्याबाबत माहिती दिली.

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी पुन्हा घोषित केले पॉझिटिव्ह

17 मार्च रोजी रात्री हिम्मतलाल यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी दाखल केला. पण पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी 18 मार्च रोजी सकाळी हिम्मतलाल शेख हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती नातेवाईकांना दिली आणि मृतदेह ताब्यात देता येणार नाही, असे सांगितले. यावरून नातेवाईकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचार करणारे डॉक्टर म्हणतात, निगेटिव्ह आणि पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर म्हणतात पॉझिटिव्ह. यामुळे नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या भोंगळ कारभारामुळे मृतदेहाची विटंबना केली जात असल्याचा आरोप केला आहे. तर याची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री (मौलाली सय्यद) यांनी केली आहे.

Last Updated : Mar 18, 2021, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.