ETV Bharat / city

'जुगार अड्डा सील', भाजपा नगरसेवकासह चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तर कारवाईत एकाचा मृत्यू - gambling in solapur

शहरातील न्यू पाच्छा पेठेत बेकायदा मटका जुगार चालवल्या प्रकरणी भाजपाचे विद्यमान नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस शिपाई स्टीफन स्वामी यांसह चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 22 जणांना अटक झाली आहे. ही कारवाई 24 ऑगस्टला रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

solapur crime
'जुगार अड्डा सील', भाजपा नगरसेवकासह चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तर कारवाईत एकाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 25, 2020, 7:26 AM IST

सोलापूर - शहरातील न्यू पाच्छा पेठेत बेकायदा मटका जुगार चालवल्याप्रकरणी भाजपाचे विद्यमान नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस शिपाई स्टीफन स्वामी यांसह चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 22 जणांना अटक झाली आहे. ही कारवाई 24 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मृताच्या पत्नीने न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक सुनील कामाठी अशोक चौक जवळील कोंची कोरवी नगर येथील मातृछाया इमारतीत जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मोबाइलच्या माध्यमातून हा मटका खेळण्यात येत होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सोमवारी दुपारी या मटका कंपनीवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी 22 जण आढळून आले, तर परवेझ उर्फ बब्बू इनामदार पळून जाताना बिल्डिंगवरील पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झालाय. तर 22 जणांना अटक करण्यात आली.

कारवाईवेळी पोलिसांनी संशयितांकडून मोबाईल फोन, दोनशे नोंदवह्या, मोटार सायकली व मटक्याचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला आहे. या जुगार अड्ड्याचा भागीदार भाजपा नगरसेवक सुनील कामाठी,पोलीस शिपाई स्टीफन स्वामी यांच्यासह 40 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरसेवक कामाठी, पोलीस शिपाई स्टीफन स्वामी सह 16 ते 18 जण फरार आहेत.

मृत परवेज यांच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी मटका बुकी कंपनीवर कारवाई केली. या दरम्यान त्या ठिकाणी काम करणाऱ्या परवेज इनामदार याचा पळ काढण्याच्या नादात मृत्यू झाला. पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

माझ्या पतीबरोबर ज्या पोलिसांनी झटापट केली, त्या पोलिसांवर कारवाई व्हावी, तसेच सुनील कामाठीवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी मृत परवेज यांच्या पत्नी राहत इनामदार यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.