ETV Bharat / city

Ekadashi Ashadhi 2022 : आषाढ वारीसाठी पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा महासागर; चंद्रभागेत स्नानासाठी एकच गर्दी - Pandharpur Wari

आषाढी एकादशीसाठी ( Ashadi Ekadashi ) पंढपूरमध्ये सुमारे 15 लाख भाविक दाखल झाले आहे. पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा महासागर लोटला आहे. ( Ocean of Vitthal devotees ) गेल्या महिनाभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्यांनी वारकरी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालत विठूरायाच्या दर्शनासाठी आले आहेत. आषाढीच्या मुहूर्तावर आज चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी विठ्ठल भक्तांचा सागर लोटला आहे. स्नानासाठी गर्दी केलेल्या वारकऱ्यांची रांग नामदेव पायरीपर्यंत दिसून येत होती. अवघ्या पंढरपूर नगरीचे वातावरण भक्तीमय विठ्ठलमय झाले आहे.

Ocean of Vitthal devotees
आषाढ वारीसाठी पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा महासागर
author img

By

Published : Jul 10, 2022, 11:17 AM IST

Updated : Jul 10, 2022, 11:39 AM IST

सोलापूर - आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ) यात्रेसाठी पंढरी सजली आहे. आज ( 9 जुलै ) सर्व पालख्यांचं पंढरपुरात आगमन झालं आहे. रविवारी आषाढी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. जवळपास 15 लाखांचा विठ्ठल भक्तांचा महासागर ( Ocean of Vitthal devotees ) पंढरपुरात दाखल झाला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी एकच गर्दी झाली आहे.आळंदी, देहू आणि महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातुन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. नामदेव पायरीसोबत ते विठुरायाचं दर्शनही घेत आहेत. चंद्रभागेत एनडीआरएफचं पथक वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

आषाढ वारीसाठी पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा महासागर

नामदेव पायरी पर्यंत लाखोंचा जनसमुदाय - आळंदी, देहू व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेले लाखो वारकरी आज आषाढ वारीला पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. लाखोंच्या संख्येने नामदेव पायरीजवळ विठ्ठल व रुक्मिणी भक्त ( Ocean of Vitthal devotees ) आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत.

Ocean of Vitthal devotees
Ocean of Vitthal devotees

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा ( Maha Pooja ) रविवारी पहाटे मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister eknath shinde ) पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी पहाटे 2.30 ते 4.30 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister eknath shinde ) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झाली.

हेही वाचा - Mahapuja CM : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, पहा पूजेचा व्हिडिओ...

Last Updated : Jul 10, 2022, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.