ETV Bharat / city

करण म्हेत्रे अंत्यसंस्कार गर्दी प्रकरणी गुन्हे दाखल, धरपकड सुरू - breaking news corona

सोलापुरात करण म्हेत्रे या सामाजिक कार्यकर्त्याचा 15 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेस 16 मे रोजी मोठी गर्दी झाली होती. कोविड नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस प्रशासनाने अंत्ययात्रेस उपस्थित असणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

करण म्हेत्रे अंत्यसंस्कार गर्दी प्रकरण
करण म्हेत्रे अंत्यसंस्कार गर्दी प्रकरण
author img

By

Published : May 19, 2021, 8:27 PM IST

Updated : May 19, 2021, 8:59 PM IST

सोलापूर - सोलापुरात करण म्हेत्रे या सामाजिक कार्यकर्त्याचा 15 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेस 16 मे रोजी मोठी गर्दी झाली होती. कोविड नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस प्रशासनाने अंत्ययात्रेस उपस्थित असणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच करण म्हेत्रे यांचा मृत्यू कोरोना विषाणूची लागण झाल्यामूळे झाला होता अशी माहिती समोर आली आहे आणि म्हेत्रे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. विद्याधर सूर्यवंशी यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण म्हेत्रे अंत्यसंस्कार गर्दी प्रकरणी गुन्हे दाखल, धरपकड सुरू

कोविड रुग्ण म्हणून दोन खासगी रुग्णालयात म्हेत्रेंना केले दाखल
करण म्हेत्रे यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती आणि तशी माहिती कोविड कन्ट्रोल रूमला देखील देण्यात आली होती. म्हेत्रे यांना 24 एप्रिलला शहरातील मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 एप्रिलपर्यंत त्यांचायवर उपचार करण्यात आले. 27 एप्रिलपासून 15 मेपर्यंत म्हेत्रे यांच्यावर शहरातील विनीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 15 मे रोजी म्हेत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र उपचार करणाऱ्या विनीत हॉस्पिटलकडे कोविड उपचार परवानगी नसल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पालिका प्रशासन नातेवाईकासमोर अंतिम संस्कार करते. तरी देखील विनीत हॉस्पिटलने म्हेत्रे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनीत हॉस्पिटलचे मालक डॉ. विद्याधर सुर्यवंशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर डॉ. सुर्यवंशी हे आयुर्वेदिक विषयात एमडी डॉक्टर आहेत, तरी देखील त्यांनी ऑलोपॅथिक उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच विनीत हॉस्पिटल सील करणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

कोरोना काळात बाधिताच्या अंत्यविधीसाठी हजारोंची गर्दी
करण म्हेत्रे यांच्या मृत्यूवेळी अशी अफवा पसरवण्यात आली होती की, हृदय विकाराच्या झटक्यात करण म्हेत्रे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे शव नातेवाईकांना दिले आहे. 16 मे रोजी सकाळच्या सत्रात मौलाली चौक ते मोदी स्मशानभूमी या मार्गावर हजारोंच्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पोलीस प्रशासन देखील गर्दी समोर पूर्णपणे हतबल झाले होते. कोरोना आजाराने मृत झाल्याची दबक्या आवाजात देखील चर्चा यावेळी सुरू होती. सोलापूर पालिका अधिकाऱ्यांनी खरी माहिती समोर आणली आणि कोरोनानेच करण म्हेत्रेचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देत सदर बझार पोलीस ठाण्यात विनीत हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला. विनीत हॉस्पिटलने कोविड उपचाराकरिता पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. तरी देखील त्यांनी विना परवानगी कोविड रुग्णावर उपचार केला आणि मृत्यू झाल्यानंतर कोविड मृतदेह नातेवाईकांना दिले अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांकडून परिसर सील, धरपकड सुरू
पोलिसांनी अंत्यसंस्कार आणि अंत्ययात्रेस गर्दी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे. सदर बझार पोलिसांनी अगोदर मौलाली चौक, भोजप्पा टेकडी, सिद्धार्थ नगर आदी परिसर सील केला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांची कोविड तपासणी सुरू केली आहे. अंत्ययात्रेस सहभागी झाल्याप्रकरणी जवळपास 250 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी जवळपास 50 जणांना अटक करण्यात आले होते. त्यांचा जामीन देखील झाला आहे. बुधवारी दिवसभरात पुन्हा 40 ते 50 जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा - जयश्री पाटील यांचा ईडीने नोंदवला जबाब, सुप्रिया सुळे यांनी धमकाविल्याचा आरोप

Last Updated : May 19, 2021, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.