ETV Bharat / city

आषाढी वारी सोहळा : वाखरी पालखी तळावर मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

author img

By

Published : Jul 16, 2021, 5:31 PM IST

पांडुरंगाच्या आषाढी वारीतील शेवटचे रिंगण वाखरी येथे होत असते. मात्र कोरोना संसर्गामुळे आषाढी वारी ही प्रातिनिधिक स्वरूपाची होणार आहे. 19 जुलै रोजी मानाच्या दहा पालख्या वाखरी येथे येणार आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाकडून पालख्यांची स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.

आषाढी वारी सोहळा
आषाढी वारी सोहळा

पंढरपूर - पांडुरंगाच्या आषाढी वारीतील शेवटचे रिंगण वाखरी येथे होत असते. मात्र कोरोना संसर्गामुळे आषाढी वारी ही प्रातिनिधिक स्वरूपाची होणार आहे. 19 जुलै रोजी मानाच्या दहा पालख्या वाखरी येथे येणार आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाकडून पालख्यांची स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. तालुका प्रशासनाकडून पहिल्यांदाच वाखरी पालखी तळावर पूर्ण बॅरिकेटींग असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

वाखरी पालखी तळावर मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

दहा संतांच्या मानाच्या पालख्यांसाठी विशेष सोय -
आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून दहा संतांच्या मानाच्या पालख्या या सर्वप्रथम वाखरी येथील पालखी तळावर येणार आहेत. या ठिकाणी दहा पालख्यांना थांबण्यासाठी दहा मंडपाचे काम सुरू आहे. प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून येथे केली जाणार आहे. तसेच बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युतव्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

तालुका प्रशासनाकडून वाखरी पालखी तळावर विशेष काळजी

सध्या कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे प्रतिनिधीक पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो आहे. त्यामुळे वाखरी पालखी तळावर परवानगी असलेल्या व्यक्तीशिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही. वाखरी येथील पालखी तळाला पहिल्यांदाच लोखंडी बॅरिकेट लावून बंदिस्त केले आहे. तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ न देण्याची काळजी तालुका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

तालुका प्रशासनाकडून 14 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष -
आषाढी वारी सोहळ्यामध्ये भाविक वारकऱ्यांची पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी 18 जुलैपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाखरी तळ, विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय अशा वेगवेगळ्या 14 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देखील प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली.

हेही वाचा - नाना पटोले यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे -दिलीप वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.