ETV Bharat / city

सोलापूरमध्ये जवळपास 9 हजार विध्यार्थीनी दिली एमपीएससीची परीक्षा - solapur marathi news

सोलापूर शहरातील 22 शाळांमध्ये जवळपास 8 हजार 889 विद्यार्थ्यां महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहेत.

सोलापूरमध्ये जवळपास 9 हजार विध्यार्थीनी दिली एमपीएससीची परीक्षा

author img

By

Published : Mar 21, 2021, 3:09 PM IST

सोलापूर - शहरातील 22 शाळांमध्ये जवळपास 8 हजार 889 विद्यार्थ्यां महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहेत. राजपत्रित अधिकारी गट अ व ब या वर्गांकरिता ही परीक्षा होत आहे. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल गनद्वारे तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. एका वर्गात फक्त 24 विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. शहरातील 22 केंद्रातील 375 खोल्यांमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. एक बेंच एक विद्यार्थी, डावीकडे उजवीकडे एक विद्यार्थी, अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा सुरू आहे.

सोलापूरमध्ये जवळपास 9 हजार विध्यार्थीनी दिली एमपीएससीची परीक्षा

तीन वेळा रद्द होऊन अखेर मुहूर्त लागला-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2020 मध्ये जाहीर केलेल्या परीक्षेचा अखेर आज 21 मार्च रोजी मुहूर्त लागला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे तयारी करत असलेले विद्यार्थ्यी आनंदात आहेत. एका वर्षापासून रखडलेली परीक्षा 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार होती. पण कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकसेवा आयोगाने ही परीक्षा रद्द केली होती. परंतु विद्यार्थ्यांनी याचा कडाडून विरोध करत आंदोलनाची भूमिका घेत रस्त्यावर उतरले होते. राज्य शासनाने पुन्हा 21 मार्च तारीख जाहीर केली होती. अखेर 21 मार्च 2021 च्या मुहूर्तावर राज्यभरातील विविध जिल्ह्यात ही परीक्षा संपन्न झाली.

पुढील परीक्षांचे देखील वेळापत्रक कोलमडून पडत आहे-

राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळीत झाल्यास पुढील परीक्षा सुरळीत होतात. पण राज्यसेवा परीक्षेचा सावळा गोंधळ होत होता. यामुळे पुढे होणाऱ्या पीएसआय, एसटीआय, सहायक, या परीक्षा देखील रखडल्या जात होत्या. आता पुढील परीक्षा देखील लवकर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा- अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.