ETV Bharat / city

सोलापुरात झुंडबळीविरोधात मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन

देशात मॉब लिचिंगच्या घटनात वाढ झाल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात मॉब लिचिंग विरोधात मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन केले.

मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन
author img

By

Published : Jul 3, 2019, 9:32 PM IST

सोलापूर - देशात काही झुंडीकडून मुस्लीम आणि दलितांना लक्ष्य केले जात आहे. मागील ५ वर्षांपासून दर महिन्याला सरासरी ७ ते ८ ठिकाणी मुस्लीम युवकांना फॅसिस्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात मुस्लीम समुदायाच्यावतीने महाआक्रोश आंदोलन करण्यात आले.

मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन

देशातल्या जवळपास १५ राज्यांमध्ये मॉब लिचिंगच्या घटनात वाढ झाली आहे. काही वृत्त संस्थांच्या म्हणण्यानुसार या घटनात २०० ते अडीचशे लोकांचा बळी गेला आहे. हिंसेसाठी आधी गो राष्ट्रवाद आणि आता जय श्री राम च्या घोषणा या झुंडीचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. या सर्व घटना राजकीय हेतूने प्रेरित असून त्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत आहेत. २ जून २०१४ ला पुण्यात सुरू झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेत सोलापूरच्या मोहसीन शेखचा बळी गेला. त्याच क्रूर कृत्यांने या घटनांना चालना दिली. त्यानंतर पहलू खान, आखलाक, अफराजूल आणि जुनैद या निरपराधांच्या जाहीर हत्या झाल्या. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा चोरीचा आळ घेत तबरेज अन्सारी या निष्पाप युवकांची हत्या केली, असा आरोप या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केला.

मुस्लीम आणि दलितविरोधी घटनांमध्ये रोहित वेमुला,नजीब आणि पायल तडवी यांचा बळी गेला आहे. कालपर्यंत रस्त्यांवर सुरू झालेली हिंसा आता महाविद्यालयांच्या कँपसपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला रोखण्यासाठी सोलापुरात मुस्लीम समुदायाच्यावतीने हे आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

Intro:सोलापूर : देशांत सत्ताधा-यांच्या पाठबळावर पोसल्या जाणाऱ्या झुंडीकडून मुस्लिम आणि दलितांना लक्ष्य केलं जात आहे.मागच्या 5 वर्षांपासून दर महिन्याला सरासरी 7 ते 8 ठिकाणी मुस्लिम युवकांना फॅसिस्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे.त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात मुस्लिम समुदायाच्यावतीनं महाआक्रोश आंदोलन करण्यात आलं.Body:देशांतल्या जवळपास 15 राज्यांमध्ये मॉब लिचिंगच्या घटनांत वाढ झाली आहे.कांही न्यूज एजन्सीजच्या म्हणण्यानुसार या घटनांत दोनशे ते अडीचशे लोकांचा बळी गेला आहे.हिंसेसाठी आधी गो राष्ट्रवाद अन आता जय श्री राम च्या घोषणां या झुंडीचं प्रेरणास्थान बनल्या आहेत.या सर्व घटना राजकीय हेतूने प्रेरित असून त्या सत्ताधा-यांशी निगडित आहेत.2 जून 2014 ला पुण्यात सुरु झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेत सोलपूरच्या मोहसीन शेखचा बळी गेला.त्याच क्रूर कृत्यांनं या घटनांना चालना दिली.त्यानंतर पहलू खान,आखलाक,अफराजुल आणि जुनैद या निरपराधांच्या जाहीर हत्या झाल्या.त्यानंतर त्यांनी आता पुन्हा चोरीचा आळ घेत तबरेज अन्सारी या निष्पाप युवकांची हत्या करण्यात आलीय.अशा प्रकारे मुस्लिम आणि दलितविरोधी घटनांमध्ये रोहित वेमुला,नजीब आणि पायल तडवी यांचा बळी गेला आहे.Conclusion:कालपर्यंत रस्त्यांवर सुरु झालेली हिंसा आता महाविद्यालयांच्या कँपसपर्यंत पोहचलीय.म्हणून या प्रवृत्तीला रोखण्यासाठी सोलापुरात मुस्लिम समुदायाच्यावतीनं हे मुस्लिमांचं महाआक्रोश आंदोलन करण्यात आलं.त्याकडं सरकार किती गांभीर्याने पाहतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.