ETV Bharat / city

Dhananjay Mahadik : राज्याच्या राजकिय परिस्थितीवर भाजपाची भूमिका 'वेट अँड वॉच' - खासदार धनंजय महाडिक

author img

By

Published : Jun 27, 2022, 7:58 PM IST

सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकारणावर भाजपची भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्यावर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. ( MP Dhananjay Mahadik on State political situation )

Dhananjay Mahadik
खासदार धनंजय महाडिक

सोलापूर - सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकारणावर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्यावर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. बंडखोरांकडून काय निर्णय होतो. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य (खासदार) धनंजय महाडिक यांनी सोलापुरात माध्यमांना बोलताना ( MP Dhananjay Mahadik on State political situation ) सांगितले. एकीकडे एकनाथ शिंदे हे आमच्या मागे शक्तिशाली पक्ष आहे असे सांगत असताना भाजपाचे नेते मात्र हात झटकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

महाडिक सोलापुरात - मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक हे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांना सध्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात भाजपचे सरकार बसेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खासदार महाडिक यांनी हात झटकण्यासारखे उत्तर दिले.

राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती - राज्यात भाजप सरकार येणार की नाही, याबाबत आज बोलणे योग्य होणार नाही. सध्याच्या परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे. कारण राज्यात आज अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.अशी परिस्थिती यापूर्वी कधीही आलेली नव्हती, त्यामुळे त्यावर आज बोलणे उचित ठरणार नाही.

भाजप नेते हात झटकत आहेत - एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या पासून सांगत आहेत,आमच्या पाठीमागे शक्तिशाली पक्ष आहे.पण भारतीय जनता पार्टीचे नेते वेट अँड वॉच सांगून हात झटकत आहेत.हा शिवसेनेचा अंतर्गत पक्ष आहे आम्ही त्यावर बोलणे उचित नाही असेही भाजपकडून सांगितले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत उभी फूट पडली आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार सावध भूमिका घेत आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political crisis: दिवसभरात काय घडले... वाचा एका क्लिकवर

हेही वाचा - Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष

हेही वाचा - Ulhas Bapat on Maharashtra Political Crisis : 11 जुलै पर्यंत परिस्थितीत जैसे थे वैसे राहणार - घटनातज्ञ उल्हास बापट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.