सोलापूर - लोक जनाधार असलेले सरकार कोसळणे इतके सोपे राहीले नाही, असे मत व्यक्त केले. जयंत पाटील यांनी सोलापुरात फडणवीस यांच्या विनंती पत्रावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना नेते व माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील सुमित्रा या सदनिकेवर चहापाणासाठी आले असता माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे हे दोन दिवसाच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पुढील दौऱ्यावर जाण्यापूर्वी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी आले होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलत असताना माहिती दिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली विनंती
महाराष्ट्र सरकार हे कायद्याने चालत नाही. येथे संवैधानिक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 24 जून) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय, असा सवाल उपस्थित करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणीस यांचे मत खोडून काढले. म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार हे जनाधारावर उभारलेले सरकार आहे. आम्ही तसे असंवैधानिक काम आम्ही केले नाही. त्यामुळे लोक जनाधार असलेले सरकार कोसळणे इतके सोपेही राहिले नाही आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या विनंती पत्रावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील
राज्याच्या अधिवेशनात विधानसभेच्या नव्या अध्यक्ष पदाची निवड होणे अपेक्षित आहे. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून संग्राम पाटील यांच्या नावाची शिफारस केली जात आहे, असा सवाल उपस्थित करताच जयंत पाटील यावर म्हणाले महाविकास आघाडीचे नेते यावर अंतिम चर्चा करतील.
मराठवाडा दौऱ्याचे स्वागत सोलापुरात
जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. याचे औचित्य साधून राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरातच प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत केले. तर शिवसेनेचे नेते माजी आमदार दिलीप माने, पृथ्वीराज माने यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, महेश गादेकर, नगरसेवक किसन जाधव, प्रशांत बाबर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - विडी उद्योग वाचवण्यासाठी सोलापुरात हजारो विडी कामगारांचा मोर्चा