ETV Bharat / city

सोलापुरात आजी-माजी शहराध्यक्षांत वर्चस्वाच्या लढाईत भरकटतोय एमआयएम पक्ष; पक्षात गळती सुरू

2014 साली झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी एमआयएम पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देत दुसऱ्या क्रमांकावर मतं मिळवली होती. त्यांनतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या 9 नगरसेवकांनी विजय मिळाला होता.

Solapur MIM City President
सोलापुरात आजी माजी शहराध्यक्षांत वर्चस्वाच्या लढाईत भरकटतोय एमआयएम पक्ष
author img

By

Published : Aug 6, 2021, 7:33 AM IST

Updated : Aug 6, 2021, 8:06 AM IST

सोलापूर- मुस्लिम समाजाचा कैवार घेऊन आलेल्या एमआयएम नेते आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा सोलापुरात जोराने सुरू आहे. सोलापुरात 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष मोठ्या ताकदीने उभा होता. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या 9 नगरसेवकांनी विजय मिळाला होता. पण शहराध्यक्ष पदावरून पक्षात दोन गट निर्माण झाले. तौफिक समर्थक आणि शाब्दी समर्थक या दोन गटांत शहराध्यक्ष पदावरून शाब्दिक चकमक देखील झाली. अखेर, सोलापूर येथील एमआयएम पक्षात गळती सुरू झाली. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. ज्या ताकदीने एमआयएम पक्षाने सोलापुरात आपले प्रस्थ निर्माण केले होते. तो पक्ष आता सोलापुरात टिकेल का नाही असा संशय मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. कारण आजी माजी शहराध्यक्षांच्या वर्चस्वाच्या लढाईत एमआयएम पक्ष सोलापुरात भरकटलेल्या अवस्थेत दिसत आहे.

सोलापुरात आजी माजी शहराध्यक्षांत वर्चस्वाच्या लढाईत भरकटतोय एमआयएम पक्ष

माजी शहराध्यक्ष तौफिक यांच्या समर्थकांनी पक्षाला ठोकला रामराम -

फेब्रुवारी 2017 मध्ये एमआयएम पक्षाचे नऊ नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत निवडून गेले. पालिकेच्या नियमानुसार एक नगरसेवक स्वीकृत घेण्याचा अधिकार एमआयएम पक्षाला प्राप्त झाला होता. त्यावेळी तौफिक शेख यांच्या कट्टर समर्थकांना अपेक्षा होती की, आपल्यामधूनच एक स्वीकृत नगरसेवक होईल. परंतु, या कट्टर समर्थकांचा अपेक्षाभंग झाला, अखेर गाजी जहागीरदार यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली. यामुळे तौफिक शेख यांच्या कट्टर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. यामध्ये कोमारु सय्यद, इम्तियाज अल्लोळी, असिफ तिमापुरे, जावेद सय्यद, दौला कुमठे आदींना गाजर दाखवण्यात आले. यांनी लगेच तौफिक शेख यांची साथ सोडत आपल्या वैयक्तिक व्यवसायात लक्ष दिले आणि काँग्रेसच्या गोटात गेले. एमआयएम पक्षाची उभारणी करतानाच्या कार्यकर्त्यांना तर नगरसेवक निवडणुकीचे तिकीटसुद्धा दिले नव्हते. यामध्ये याकूब शेख, शकील शेख यांना वेळोवेळी ठेंगा दाखवण्यात आला होता.

फारूक शाब्दीच्या आगमनानंतर तौफिक समर्थकांत नाराजी -

2014 साली झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी एमआयएम पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देत दुसऱ्या क्रमांकावर मते प्राप्त केली होती. यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट प्राप्त झाले होते. त्यावेळी तौफिक शेख एका खून प्रकरणात विजयपूर (कर्नाटक) येथील कारागृहात संशयीत आरोपी म्हणून बंद होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी यांना देखील दुसऱ्या क्रमांकावर मते प्राप्त झाली. पण फारूक शाब्दी यांच्या आगमनानंतर सोलापूर येथील एमआयएम पक्षात कुजबुज सुरू झाली होती. यावर वेळोवेळी पडदा टाकण्यात आला होता. ऐनवेळी पक्षाने उमेदवार बाहेरून आयात करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. शहर मध्य विधानसभा क्षेत्र मुस्लिम बहुल असल्याने स्थानिक नेत्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे न होता फारूक शाब्दी यांना मुंबईहुन आयात करण्यात आले.

शहराध्यक्षपदी स्थानिक नेता असावा अशी होती प्रमुख मागणी -

2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार शहर मध्य मधून पराभूत झाले होते. पण 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेत एमआयएम पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून गेल्यामुळे स्थानिक पातळीवर एमआयएमची छाप होती. 2019 नंतर शहराध्यक्ष पदासाठी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते तौफिक शेख यांनाच हे पद द्यावे अशी प्रमुख मागणी करत होते. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख असे दोन्ही पद फारूक शाब्दी यांकडे सोपवले. यामुळे तौफिक शेख समर्थकांत नाराजी पसरली आणि तौफिक शेख समर्थक आणि फारूक शाब्दी समर्थक असे दोन गट निर्माण झाले. एका राजकीय वर्चस्वाच्या शीतयुद्धाला आरंभ झाला. हे दोन्ही गट एमआयएममध्येच आहेत, पण पक्षासाठी म्हणावे इतकी धडपड किंवा पक्षासाठी कार्य होताना या गटाकडून दिसत नाही.

एमआयएम नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा -

तौफीक शेख समर्थकांनी व काही नगरसेवकांनी फारूक शाब्दी सोबत न राहण्याचा निर्णय घेत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा वाढविला आहे. यामध्ये नगरसेवक तौफिक शेख, तस्लिम शेख, वहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, शजिया शेख आदींनी तौफिक शेख यांसोबतच राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण अधिकृतपणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही. आजही ते एमआयएम पक्षाचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तर अजहर हुंडेकरी, रियाज खरादी, गाजी जहागिरदार हे नगरसेवक फारूक शाब्दी यांकडे आपले अस्तित्व टिकवून आहेत.

कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण -

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रभावामुळे सोलापुरातील अनेक तरुण एमआयएम पक्षाचे कट्टर समर्थक आहेत. पण शहराध्यक्ष पदावरून सोलापुरातील एमआयएम पक्षात दोन गट निर्माण झाले असल्याने अनेक कार्यकर्त्यांत संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2014 पासून मुस्लिम समाजात जागा निर्माण करणारा पक्ष भविष्यात सोलापुरात टिकेल का नाही अशी देखील चर्चा होऊ लागली आहे.

Last Updated : Aug 6, 2021, 8:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.