ETV Bharat / city

भाजपला मतदान करणाऱ्या एमआयएम नगरसेविकेची हकालपट्टी - Expulsion of MIM corporator

सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समिच्यांच्या निवडणूकीत एमआयएम नगरसेविका इरफआन शेख यांनी भाजपला मतदान केले होते. यामुळे त्यांची एमआयएम पक्षातून हक्कालपट्टी केल्याची माहिती शहर प्रमुख फारूक शाब्दी यांनी दिली.

MIM corporator who voted for the BJP was remove from the party
भाजपला मतदान करणाऱ्या एमआयएम नगरसेविकेची हकालपट्टी
author img

By

Published : Jan 9, 2021, 3:42 PM IST

Updated : Jan 9, 2021, 3:54 PM IST

सोलापूर- महानगरपालिकेत विषय समित्यांची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एमआयएम नगरसेविका तस्लिम इरफान शेख यांनी भाजपला मतदान केले. पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्यामुळे एमआयएमचे जिल्हा व शहर प्रमुख फारूक शाब्दी यांनी सोलापूर महानगरपालिका नगरसेविका तस्लिम शेख यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पक्षा विरुद्ध जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असलेल्या सहा नगरसेवकांवर देखील कारवाई करणार असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली.

भाजपला मतदान करणाऱ्या एमआयएम नगरसेविकेची हकालपट्टी

विषय समितीच्या निवडणूकित भाजपला मतदान -

सोलापूर महानगरपालिके मध्ये सात विषय समित्यांची निवडणूक झाली. त्यामध्ये एमआयएमच्या नगरसेविका तस्लिम शेख यांनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. एमआयएम पक्ष एकीकडे भाजपला सत्ते पासून दूर रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सोलापूर महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविकेमुळे भाजपला विषय समितीचे सभापती पद मिळाले.

एमआयएमच्या आणखीन पाच नगरसेविकांवर कारवाईची टांगती तलवार -

2017 मध्ये सोलापूर महानगरपालिका निवडणूकित एमआयएम पक्षाने मोठी मुसंडी मारत 8 नगरसेवक निवडून आले होते. आता मात्र काही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात गेले आहेत. तौफिक शेख, वहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, शहजादीबानो शेख, हे आहेत. लवकरच हे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी या पाच ही नगरसेवकांचा पक्ष विरोधी कारवाया केल्याचा अहवाल पक्ष प्रमुखांकडे पाठविला आहे. लवकरच या नगरसेवकांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

तौफिक शेख आपल्या सहकारी नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील -

एमआयएम नगरसेवक लवकरच आपल्या गटातील पाच नगरसेकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांना काय पद मिळेल. किंवा ज्या प्रकारे एमआयएम मध्ये मान सम्मान मिळत होता. तसा मान सम्मान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मिळेल का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक दिगग्ज नेते ठाण मांडून आहेत.

तौफिक शेख बाबत मुस्लिम समाजात नाराजगी -

तौफिक शेख हे काँग्रेस मधून आले आहेत. सुशील कुमार शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस मध्ये असताना त्यांनी आपल्या भावाला महापौर पदावर बसवले होते. 2014 मध्ये सत्तेसाठी तौफिक शेख यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात जाऊन सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएम च्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवत कढवी झुंज दिली होती . 2014 पासून एमआयएम पक्षा मुळे तौफिक शेख यांच्या बाजूने मुस्लिम समाज खम्बीर उभा होता. मात्र, एमआयएम सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तौफिक शेख जात असल्याने मुस्लिम समाजात नाराजगी पसरली आहे.

Last Updated : Jan 9, 2021, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.