ETV Bharat / city

विधान परिषद निवडणूक: कोरोनाबाधितांना मतदानासाठी रुग्णवाहिकेची सेवा

कोरोनाबाधित अथवा बधितांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केलेले आहे. काही रुग्ण रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी ज्याचे नाव शिक्षक मतदार संघाच्या किंवा पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव असेल, त्यांना मतदान करावयाचे असल्यास सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

legislative-council-election-ambulance-service-for-corona-patients
रुग्णवाहिका
author img

By

Published : Dec 1, 2020, 6:48 AM IST

सोलापूर - विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. याबाबत अधिकृत माहिती सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

सोलापुरात कोरोनाबाधितांना मतदानासाठी रुग्णवाहिकेची सेवा

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी तैनात-
विधान परिषदेची निवडणुकीसाठी आज १ डिसेंबरला मतदान होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 197 केंद्रावर विधान परिषदेचे मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहे. हे आरोग्य कर्मचारी प्रत्येकाचे तापमान तपासणी करून मतदारांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था-
कोरोनाबाधित अथवा बधितांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केलेले आहे. काही रुग्ण रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी ज्याचे नाव शिक्षक मतदार संघाच्या किंवा पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव असेल, त्यांना मतदान करावयाचे असल्यास सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णांना रुग्णवाहिका मतदान केंद्रापर्यंत घेऊन जातील आणि आणि परत घेऊन उपचारासाठी दाखल करतील, अशी माहिती, मनपा उपायुक्तांनी दिली.

मतदारांनी त्रिसूत्रीचा अवलंब करावा-
पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदारांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोविड रुग्णांनी मतदानासाठी असा करावा संपर्क -
सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी मनपाच्या कोविड कंट्रोल रूम येथील व्हाटसअप क्रमांकावर संपर्क करून लोकेशन द्यावे लागेल. तसेच पॉझिटिव्ह रिपोर्ट, मतदान कार्ड आणि मतदान केंद्राचे ठिकाण कळवावे लागेल. जेणेकरून सुरक्षितरित्या मतदानाचा हक्क बजावता येईल.

हेही वाचा -आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आले का; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

हेही वाचा -महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचा विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.