सोलापूर - शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला असल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सततच्या पावसामुळे खरीप पीक धोक्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या तीनही महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जून आणि जुलै महिन्यात चांगल्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे खरिपाची पिके चांगली आली होती. यातच ऑगस्ट महिन्यातही ही पावसाची संततधार सुरूच आहे. मागील दोन दिवसात पावसाने उसंत घेतली होती, त्यामुळे खरिपाच्या पिकांना जोम येईल असे वाटत असतानाच आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जास्तीच्या पावसामुळे खरीपाची पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात खरिपाची पेरणी वाढले असून सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सोयाबीन पीकही ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत.