ETV Bharat / city

प्रकरण मिटवण्याऐवजी जात पंचायतीने टाकले वाळीत, पुन्हा जातीत घेण्यासाठी मागितली लाच - सोलापूर जात पंचायत बातमी

जात पंचायतीने गोंधळी समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकले होते आणि परत समाजात घेण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोलापूर येथील गोंधळी जात पंचायतीमधील चार पंचाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी यांनी तपास करत चोघा पंचना अटक केले आहे

शरणीदास भोसले
शरणीदास भोसले
author img

By

Published : Aug 4, 2021, 6:10 PM IST

Updated : Aug 4, 2021, 7:06 PM IST

सोलापूर - जात पंचायतीने गोंधळी समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकले होते आणि परत समाजात घेण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोलापूर येथील गोंधळी जात पंचायतीमधील चार पंचाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी यांनी तपास करत चोघा पंचना अटक केले आहे. शरणीदास पांडुरंग भोसले यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पत्नी नांदत नसल्याने शरणीदास भोसले यांनी जात पंचायतीकडे वाद मिटवण्यासाठी दाद मागितली होती. पण, जात पंचायतीने वाद मिटवण्याऐवजी त्यांना वाळीत टाकले.

बोलताना तक्रारदार व पोलीस निरीक्षक

सांगली येथील पती आणि कोल्हापूर येथील पत्नी जात पंचायत मात्र सोलापुरात

शरणीदास पांडुरंग भोसले (वय 40 वर्षे, रा. मांगले, ता. शिराळा, जि0 सांगली) यांचा विवाह माया (रा. कोल्हापूर) यासोबत झाला होता. तीन अपत्ये झाल्यानंतर पती-पत्नीत मोठे वाद निर्माण झाले होते. पण, हा मिटवण्यासाठी या पती पत्नीने जात पंचायतीचा आधार घेत गोंधळी समाजातील जात पंचायतीकडे दाद मागितली होती. शरणीदास भोसले यांचे पूर्वज मुळात जोशी गल्ली (रविवार पेठ, सोलापूर) येथील असल्याने त्यांना सोलापूर येथीलच जात पंचायतीकडे दाद मागण्यासाठी यावे लागले. पण, जात पंचायतीने न्याय देण्याऐवजी उलट या पती-पत्नीला समाजातून 2018 सालापासून बहिष्कृत केले होते. वाळीत टाकल्यामुळे समाजातील इतर पाहुणे, मित्र मंडळींनीही या कुटुंबास कोणत्याही कार्यक्रमास बोलावणे बंद केले होते.

जात पंचायतीचा निर्णय मागे घेण्यासाठी पंचांनी दोन लाख रुपयांची मागितली लाच

शरणीदास भोसले यांनी गोंधळी समाजाच्या जात पंचायतीचे निर्णय मागे घेण्यासाठी 2018 सालापासून खूप प्रयत्न केले. पण, जात पंचायत आपले निर्णय मागे घेत नव्हती. अखेर पंचांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. शेवटी शरणीदास भोसले यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याबाबत गोंधळी समाजाचे पंच राम धोंडिबा शिंदे-पाटील, अशोक शिंदे-पाटील, नाना शिंदे-पाटील, संतोष राम शिंदे-पाटील (सर्व रा.न्यू शिवाजी नगर, गोंधळी वस्ती, सोलापूर) यांच्या विरोधात तक्रार दिली. प्रकरणाची दखल घेत वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ताबडतोब संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

जात पंचायतीच्या भीतीमुळे आजारी आईलाही पाहू शकलो नाही

शरणीदास भोसले यांचे सर्व कुटुंब कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी आई आजारी असल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. शरणीदास याने आईला पाहण्यासाठी रुग्णालय गाठले आणि गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या सदस्यांना माहित झाले तर ते मलाही जातीतून वाळीत टाकलीत, या भीतीने शरणीदासच्या भावाने आईला भेटू दिले नाही.

हेही वाचा - सोलापुरात कोरोना नियमांचे उल्लंघन; विना परवाना म्हशी पळवण्याचा कार्यक्रम

Last Updated : Aug 4, 2021, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.